सुरेश धस म्हणाले, राष्ट्रवादीत अनेक बिघडलेले पुतणे, त्यांना बायकाही देणार नाही मत

सुरेश धस म्हणाले, राष्ट्रवादीत अनेक बिघडलेले पुतणे, त्यांना बायकाही देणार नाही मत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बायका सुद्धा त्यांना मतदान करणार नाहीत. पंकजा मुंडे यांच्या बचत गटांच्या चळवळीमुळे आता कारभार महिलांच्या हातात आला आहे

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,10 ऑक्टोबर: आमच्या घरात सगळं आलबेल आहे, असं सांगायची वेळ का येते, असा सवाल भाजपचे माजीमंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी थेट शरद पवार यांना केला आहे. शरद पवारांच्या घरात काही तरी गडबड सुरू आहे. रुसवे-फुगवे चाललं आहे. पुन्हा तेच म्हणतात की, आमच्या घरात सगळं आलबेल आहे. पण आमच्या घरात काही नाही हे सांगायची वेळ का येते, म्हणजे काहीतरी चाललं आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील अनेक बिघडलेले पुतणे घरात घेतले, त्यामुळे त्यांच्या घरात तशी सवय लागली असेल. एकादा कांदा सडला तर त्याला आपण बाजूला काढतो, नाहीतर सगळे कांदे खराब होतात, अगदी तसंच झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक बिघडलेले पुतणे राष्ट्रवादीत गेल्यामुळे पवार कुटुंबात नवे राजकारण सुरू झाले आहे, असा टोला सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे.

महायुतीचे उमेदवार माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारसभेत बीड मतदार संघातील राय मोहा येथे आयोजित सभेत सुरेश धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे जयदत्त क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मूलूक, अनिल जगताप, राजेंद्र मस्के व स्थनिक नेते मोठ्या संख्येने उपस्थिती होले.

सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्यावरही घणाघाती टीका केली. ज्येष्ठ नेत्याला कसं बोलावं याचं भान नाही. जयदत्त अण्णाचे कपडे फाडून रावण बोलणं शोभलं पाहिजे. उलट असं बोलल्याने लोक तुम्हाला मत देणार नाहीत. काही माजी आमदार आमच्यावर टीका करतात अगोदर त्यांनी दर्ग्यात जाऊन पूजा कराव्यात. लोकांवर बोलण्याचा अधिकार नाही, असें सांगताना राष्ट्रवादीतील प्रमुख सोडून जात आहेत. हे सत्तेंवर येण्याची स्वप्न पाहतात, हे कसं शक्य आहे. जुन्या पक्षावर प्रेम दाखवू नका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांना निवडून द्या, ते मंत्री होते आणि पुन्हा होणार आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बायका सुद्धा त्यांना मतदान करणार नाहीत. पंकजा मुंडे यांच्या बचत गटांच्या चळवळीमुळे आता कारभार महिलांच्या हातात आला आहे. तब्बल 46 लाख बचत गट बनवले आहेत. त्यामुळे मतदान करताना विचार करा, असे सुरेश धस यांनी टीका केली.

पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीतकौर राणा

Published by: Sandip Parolekar
First published: October 10, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading