पंकजा मुंडेंसमोर पेच.. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'या' जागेवर घटक पक्षांची रस्सीखेच

पंकजा मुंडेंसमोर पेच.. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'या' जागेवर घटक पक्षांची रस्सीखेच

भाजपचा गड समजला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षाने तीन विधानसभाच्या जागांवर दावा केल्याने पंकजा मुंडेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यात रिपाइंने मराठवाड्यातील केज या एका जागेवर दावा केला आहे.

  • Share this:

बीड,25 सप्टेंबर: भाजपचा गड समजला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षाने तीन विधानसभाच्या जागांवर दावा केल्याने पंकजा मुंडेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यात रिपाइंने मराठवाड्यातील केज या एका जागेवर दावा केला आहे. रिपाइंचे युवक प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे यांच्या उमेदवारीची थेट मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंकडे मागणी केली. यातच शिवसेनेने दोन जागांचा हट्ट धरला आहे. या बाबतीत चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले आहे.

सध्या बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघांपैकी पाच जागेवर भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, घटक पक्षाने उमेदवारीचा दावा केल्याने पंकजा मुंडेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सेना-भाजप युती झाली तर बीडमधील दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या अंतर्गत रस्सीखेचचा फायदा विरोधीपक्षाला होण्याची शक्यता आहे.

महायुतीमधील घटक रिपाइंने जोर लाऊन बीड जिल्ह्यातील केज विधानसभेच्या तिकीटाची मागणी केली. यातच गेल्या पाच वर्षात भाजपाच्या आमदारांनी लोकांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. तसेच विकास कामे देखील केली नाही, असा आरोप करत डोंगर दऱ्यातील सामान्य लोकांच्या समस्या समजून घेत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, आणि पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाने केज मतदार संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन रिपाइं ही निवडून लढवणार आहे, असे पप्पू कागदे यांनी सांगितले. तसेच रिपाइंच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.

बीड जिल्ह्यातील सहाही मतदार संघात रिपाइंची वोट बँक निर्णायक आहे. जिल्ह्यात संघटनेची स्वतंत्र बांधणी आणि तगडे नेटवर्क आहे. यात पंकजा मुंडेंच्या परळी मतदार संघात रिपाइंचे पप्पू कागदे यांच्या दलित मतदारावर मोठा प्रभाव आहे. यामुळे उद्याच्या निवडणुकीत तिकीटाबाबतीत विचार केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील इतर मतदार संघावर पण परिणाम पाहायला मिळेल. तसेच विधानसभा निवडणुकी रिपाइंसह दलित मतदारांची नाराजी घेणे. भाजपला परवडणार का? असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा गड असलेल्या बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडीला वेग आला. राष्ट्रवादीने पाच जागेवरी उमेदवार घोषित केल्यानंतर आत भाजपमधील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु आहे. यातच सेना, रिपाइं, शिवसंग्राम हे देखील तिकीट मागण्याच्या शर्यतीत मागे नाहीत. म्हणून बीडमध्ये तिकीट मिळाल्यानंतर बऱ्याच उलथापालथी होणार आहेत तर तिकीट न मिळाल्याने नाराज गट बंडखोरी, गटबाजी तसेच पाडापाडीचे राजकारण पाहायला मिळणार, यात शंकाच नाही. भाजप व मित्र पक्षातील अंतर्गत वादावादी मुंडे-मेटे क्षीरसागर यांच्या रस्सीखेच सुरु आहे. याचे परिणाम निवडणुकांवर दिसणार आहेत.

VIDEO:आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

Published by: Sandip Parolekar
First published: September 25, 2019, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading