Elec-widget

या जिल्ह्यात भाजपला लागले बंडखोरीचे ग्रहण, शिवसेनेचा उमेदवार अडचणीत

या जिल्ह्यात भाजपला लागले बंडखोरीचे ग्रहण, शिवसेनेचा उमेदवार अडचणीत

हिंगोली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. कळमनुरी आणि वसमत या दोन जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे गेल्या. पण मागील पाच वर्षांत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या दोन्ही मतदार संघात भाजप नेत्यांनी आपली ताकद वाढवली.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल,(प्रतिनिधी)

हिंगोली,5 ऑक्टॉबर:हिंगोली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. कळमनुरी आणि वसमत या दोन जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे गेल्या. पण मागील पाच वर्षांत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या दोन्ही मतदार संघात भाजप नेत्यांनी आपली ताकद वाढवली.

कळमनुरी विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर या मतदार संघात भाजपकडून माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे इच्छुक होते. मतदार संघात यांनी काम करून भाजप वाढवली. युती तुटली तर निवडणूक लढवणार आणि युती झाली तरी भाजपकडे हा मतदार संघ जाईल, या आशेने या नेत्यांनी कामे केली. यामध्ये गजानन घुगे यांनी तर लाखोंचा निधी सुद्धा मतदार संघात आणला. कार्यकर्त्यांची फौज तयार केली. पण युती झाली आणि शिवाजी माने आणि गजानन घुगे यांचा हिरमोड झाला. अखेर नाराज झालेल्या या दोघांनी युती धर्माला लाथ मारत उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या अडचणीत या बंडखोरांमुळे मोठी वाढ झाली आहे. या दोन दिग्गज नेत्यांनी जर उमेदवारी मागे घेतली नाही तर याचा फटका संतोष बांगर यांना बसण्याची शक्यता आहे.

वसमत विधानसभा मतदार संघ देखील शिवसेनाला सुटला आहे. याठिकाणी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, 2014 साली युती तुटल्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या शिवाजी जाधव यांनी तब्बल 50 हजार मते मिळवली होती. या बळावरच वसमत मतदार संघात 2019 निवडणूक लक्षात ठेऊन शिवाजी जाधव यांनी तयारी केली होती. मात्र, युतीमध्ये वसमत शिवसेनेने विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या शिवाजी जाधव यांनी भाजपशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजी जाधव यांची बंडखोरी झाल्याने माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत पाहता हिंगोली जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांनी केलेली बंडखोरी ही शिवसेना उमेदवारांना चांगलीच अडचणीत आणणार आहे.

आरेत रात्री केलेल्या झाडांच्या कत्तलीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले? पाहा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...