प्लास्टिक कपचा वापर.. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:लाच ठोठावला 5 हजाराचा दंड

प्लास्टिक कपचा वापर.. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:लाच ठोठावला 5 हजाराचा दंड

चक्क चहाच्या प्लास्टिक कपनेच जिल्हाधिकाऱ्यांना 5 हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे.

  • Share this:

सुरेश जाधव (प्रतिनिधी)

बीड,7 ऑक्टोबर- आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेकांना दंड ठोठावल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र बीडमध्ये सोमवारी वेगळच प्रकार घडला. चक्क चहाच्या प्लास्टिक कपनेच जिल्हाधिकाऱ्यांना 5 हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने स्वत:वरच ही दंडात्मक कारवाई केली आहे. बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः लाच 5 हजार रुपयांचा दंड केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःवर दंडात्मक कारवाई केल्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असावी. कायद्याचे रक्षण करणारेही कायद्याच्या कक्षेत असतात. तेही यातून सुटत नाहीत, हे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी दाखवून दिले आहे.

झालं असं की, बीड जिल्ह्यातील निवडणुकांच्या संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यासाठी बीडचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचा पाहुणचार करताना कर्मचाऱ्यांनी चहा देताना प्लास्टिक मिश्रित कपचा वापर केला. उपस्थित सर्व पत्रकारांना प्लास्टिक कपमध्ये चहा देण्यात आली. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त पत्रकारांनी चहा घेण्यास नकार दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन झाल्यानंतर एका पत्रकाराने सवाल उपस्थित केला.

एका गरीब शेतकरी उमेदवाराने डिपॉझिटचे पैसे भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केला होता. डिपॉझिटची रक्कम चिल्लर स्वरूपात प्लास्टिकच्या पिशवीत अर्थात कॅरिबॅगमध्ये आणली होती. त्यानंतर या उमेदवारांला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या घटनेचा संदर्भ देत जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र प्लास्टिक मिश्रित कप का वापरले जातात, मग प्लास्टिक बंदीचे काय, पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारल्यानंतर जिल्हाधिकारी गोंधळात पडले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःची सोडवण करत सर्व पत्रकारांसमोर स्वतःला पाच हजार रुपये दंड केल्याचे जाहीर केले.

प्लास्टिक बंदीचा संदर्भामध्ये महाराष्ट्रात कठोर नियम आणि कायदे केला जात आहेत. मात्र, चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्लास्टिक मिश्रित कपचा वापर केला जात असेल तर प्लास्टिक बंदी होणार कसे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पण बीडमध्ये कायदा करणारच कायद्याच्या कचाट्यात सापडेले बीडमध्ये पाहायला मिळाला. नंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली.

VIDEO : महादेव जानकरांची खदखद बाहेर, भाजपबद्दल म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या