राष्ट्रवादीत किरायादार घराचे 'मालक' झाले, मुंदडांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

राष्ट्रवादीत किरायादार घराचे 'मालक' झाले, मुंदडांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

राष्ट्रवादी पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी विमलताई मुंदडांचे नेतृत्त्व संपवण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

बीड,30 सप्टेंबर: परळी येथील गोपीनाथ गडावर राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या नमिता मुंदडा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. समर्पण, संघटन आणि सर्वे हे तीन विषय समोर ठेवून उमेदवारी ठरवा हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी घालून दिलेला नियम समोर ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नमिता मुंदडा यांनी यावेळी सांगितले. काही लोकांची मूळ सुरुवात आमच्याकडे झाली पुन्हा ते मुळाकडे आले. पक्ष प्रवेश घेताना आम्ही कोणाला घ्यायचे याचे फिल्टर लावले आहे. मुंदडा कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्यामळे अक्षय आशीर्वाद द्यायचे मी ठरवले, असे सांगत पंकजा मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचे स्वागत केले.

मेगाभारतीची सुरुवात बीडमधून मी केली..

मेगाभारतीची सुरुवात बीडमधून मी केल्याची दावा करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. राज्याचं राजकारणच बीडमधून फुलतं. कारण शरद पवार येथे येवून उमेदवारांची घोषणा करतात. बीड जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी घडतात, असे म्हणताना मला वाटतं नाही धनंजय मुंडे राज्याचे नेतृत्त्व करता, असा धनंजय मुंडेंना टोला लगावला.

नव्या नेत्यांनी विमलताईंचे नेतृत्त्व संपवण्याचा प्रयत्न केला..

राष्ट्रवादी पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी विमलताई मुंदडांचे नेतृत्त्व संपवण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातल्या नेत्यांनी मला पवार साहेबांचा हात सोडायला भाग पाडलं विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी गेल्या पाच वर्षांत त्रास दिला, असे अक्षय मुंदडा (नमिता मुंदडांचे पती) यांनी आरोप केला. शिवस्वराज यात्रेत हेवेदावे केले.अजित पवार यांनी अंबाजोगाईला येवू दिले नाही. शेवटी मी घरी आलोय, आईची जबाबदारी ताई पार पाडतील. स्व.विमलताई मुंदडांनी बीडची राष्ट्रवादी स्थापन केली. राष्ट्रवादी स्थापन केलेले एकही कुटुंब नव्याने आलेल्या लोकांनी ठेवले नाही. शेवटी आमचे घर होते, मात्र आम्हाला ढकलून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. किरायादार घराचे मालक झाले, अशा शब्दात धनंजय मुंडेंना टोला लगावला.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

First published: September 30, 2019, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading