धनंजय मुंडेंसाठी 82 वर्षांचा 'हा' नेता गाजवणार मैदान!

वयाच्या 82 व्या वर्षी परळी मतदारसंघात माजी आमदार पंडितराव दौंड हे आज मैदानात उतरले असून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 09:26 PM IST

धनंजय मुंडेंसाठी 82 वर्षांचा 'हा' नेता गाजवणार मैदान!

सुरेश जाधव, परळी 08 ऑक्टोंबर : परळी रेणापूर मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडेयांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा हातात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड हे आज मैदानात उतरले असून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय.  त्यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे.1 985 साली परळी रेणापूर मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडे याना 3500 मताधिक्याने पराभूत करून त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यावेळी त्याची चर्चा सर्व महाराष्ट्रात झाली होती.  तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेच्या सोबत आहेत. प्रचाराची रणधुमाळी पेटलेली असताना परळी मतदारसंघांमध्ये मात्र मुंडे बंधू-भगिनीच्या लढत महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे.

जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू - उद्धव ठाकरे

या लढती मध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. यातच परळी मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधामध्ये  आरोप-प्रत्यारोपा सह बेरीज वजाबाकीचे राजकारण करत आहेत. एवढेच नाही तर या मतदारसंघातील प्रत्येकाला आपण किती वरचढ आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातिल काँग्रेसचे वजनदार नेते टि.पी मुंडे यांचा भाजपा प्रवेश घेतल्यानंतर आता निवडणुकीच्या आखाडयात वातावरण तापलेलं आहे.

तर दुसरीकडे याच परळी मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडे यांना चितपट करणारे माजी आ.पंडितराव दौंड हे धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी वयाच्या 82 व्या वर्षी पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत गावो गावी लोकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांची  मोर्चे बांधणी सुरु आहे.

'मॉब लिंचिंग'च्या वादावर ओवेसींनी दिलं मोहन भागवतांना 'हे' उत्तर!

Loading...

या मतदारसंघात दौंड यांचा खूप मोठा जनसंपर्कही आहे त्याबरोबरच जिल्हा परिषद सर्कल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेटवर्क  असलेले दौंड हे स्व.गोपीनाथ मुंडेचे जवळचे नातेवाईकही आहेत. त्यातच आज धनंजय मुंडे यांच्यासोबत तारणहार म्हणून फिरताहेत. 1985मध्ये  पंडितराव दौंड आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 35718 मतदान घेऊन विजयी झाले होते तर स्व.गोपीनाथ मुंडेना 31067 मतदान पडले होते त्यावेळीचा  विजय आजही सर्वांच्या लक्षात आहे कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी हावडा फेम बाबुराव आडसकर यांना 1980 साली रेणापूर परळी  मतदारसंघांमधून चितपट केले होते. आणि रेनापुर मतदारसंघांमध्ये अडसकर यांना पडणारा पट्ट्या कोण अशी चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.

पार्थ प्रचाराला येणार का? रोहित पवारांनी दिलं हे उत्तर!

यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना पाडणारा पठ्ठ्या कोण तर म्हणून पंडितराव दौंड यांची ओळख आहे. आणि आज याच पंडितराव यांनी वयाच्या 82व्या वर्षी धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी परळी मतदारसंघ पिंजून काढत आहेत आहे एवढेच नाही तर जुने डावपेच आखत पुन्हा एकदा नव्या तरुणांना आशीर्वाद देत नव्या नेत्यांना साथ द्या असे आवाहन करत आहेत. त्यांचा मुलगा संजय दौंड हा जिल्हा परिषद सदस्य आहे. यामुळे येत्या निवडणुकीत दौंड पिता पुत्र धनंजय मुंडेना मदतीला धावले आहेत. यामुळे सध्यातरी परळीच्या राजकारणामध्ये गरमागरम वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...