लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात वाहिला रक्ताचा पाट, पतीनं कोयत्याने केली पत्नीची निर्घृण हत्या

लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात वाहिला रक्ताचा पाट, पतीनं कोयत्याने केली पत्नीची निर्घृण हत्या

सगळ्यात धक्कादायक म्हणजे भर रस्त्यावर पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने कोयता मृतदेहावर ठेवला आणि...!

  • Share this:

बीड, 30 मे : एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन अवलंबवण्यात आलं आहे तर दुसरीकडे या लॉकडाऊनमध्ये गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. कोरोनाचा कहर एका बाजूला आणि बीड जिल्हयात महिन्याभरात आठ खून, पाच पेक्षा अधिक आत्महत्या आणि मारहानीच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. आताही हत्येचा असाच खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पतीने पत्नीची भर रस्त्यावर कोयत्याने निर्घृण हत्या केल्याचा गंभीर प्रकार काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास घडला आहे. उर्मीला रमेश मस्के (वय 37 ) असे मयत महिलेचं नाव आहे. किरकोळ वादातून पतीने टोकाचं पाऊल उचलत कोयत्याने पत्नीचा खून केला. यानंतर रमेश मस्के याने स्वतः पोलिसांत जाऊन घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पती रमेश मस्के विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पहिल्यांदा कोरोनासंबंधी आली चांगली बातमी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा घटला

 भर रस्त्यावर पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने कोयता मृतदेहावर ठेवला आणि गाडीवर बसून आरामात शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीसांना घटनेची माहिती दिली. या सगळ्या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शिवसेना नेत्याच्या हत्येमागे भाजप नेत्याचा होता हात, 4 आरोपींनी केली अटक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर सासरच्या मंडळीकडून सतत त्रास दिला जात होता असा आरोप उर्मीलाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलीस कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांची चौकशी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 30, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या