Lockdown: मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

Lockdown: मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

'प्रशासन त्यांची पूर्ण काळजी घेत होतं. मात्र सर्व खबरदारी घेऊनही ते गुंगारा देऊन निसटून जाण्यात यशस्वी ठरले.'

  • Share this:

उस्मानाबाद 15 एप्रिल: लॉकडाऊनमुळे राज्यातल्या सगळ्याच भागात मजूर अडकून पडले आहेत. स्थिनिक प्रशासनाने अशा मजुरांसाठी मदत केंद्र तयार केले असून त्यांना तिथे ठेवण्यात आलंय. मात्र घराच्या ओढीने हे मजूर तिथूनही निसटून जात असून त्यामुळे प्रशासनाची झोप मात्र उडाली आहे. उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत तेलंगणातल्या मजुरांना ठेवण्यात आलं होतं. प्रशासनाने त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली होती. मात्र गेल्या 15 दिवसांपासून या मदत केंद्रांमध्ये राहणारे 465 नागरीक हे गेल्या तिन दिवसात टप्प्या टप्प्याने पळून गेल्याची माहिती उघड झाली असून हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

28 मार्च रोजी तालुक्यातील कसगी येथे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तेलंगणामधील 465 नागरीक लॉकडाउनच्या काळात अडकले होते. त्यांना कर्नाटक पोलीस त्यांच्या सिमेत घेत नव्हती. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार ह्या मजुरांना उमरगा प्रशासनाने स्थानिक औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या मदत केंद्रात ठेवलं होतं. ह्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा होता. त्यांना दररोज जेवण दिले जात होते . मात्र 12 तारखेला 215 नागरीक पळून गेले तर 13 तारखेला अंदाजे 20 नागरीक पळून गेले.

गेले तर मंगळवारी 14 एप्रिलला सकाळी 11च्या दरम्यान उरलेले सगळे पळून गेल्याचं उघड झालं. लॉकडाऊनच्या काळात ह्या सर्व 465 नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. तर हे नागरीक टप्प्या टप्प्याने पळून जात असताना प्रशासनाला माहिती कसे झाले नाही? पोलिस बंदोबस्त असताना इतका मोठ्या संख्येने हे लोक पळून कसे गेले? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर

याबाबत उमरग्याचे तहसीलदार राजेंद्र पवार यांनी माहिती दिली की, हे लोक दररोज आम्हाला घरी जाऊ द्या असा तगादा लावत होतं. त्यांना तातडीने घरी जायचं होतं. प्रशासन त्यांची पूर्ण काळजी घेत होतं. मात्र सर्व खबरदारी घेऊनही ते गुंगारा देऊन निसटून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा -

ATMमधून पैसे नाही तर येणार तांदूळ, लॉकडाऊनमध्ये 'या' देशाने अशी केली सोय

कोरोनामुळे हाहाकार, वाचा जगभरातील अपडेट आकडेवारी

 

First published: April 15, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या