चोरी झाली.. ती पण चक्क पोलीस ठाण्यात, लांबवल्या दारूच्या बाटल्या

चक्क पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची लाजिरवाणी घटना घडल्यानंतर या संबंधी पोलीस विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली...

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 05:07 PM IST

चोरी झाली.. ती पण चक्क पोलीस ठाण्यात, लांबवल्या दारूच्या बाटल्या

कन्हैया खंडेलवाल,(प्रतिनिधी)

हिंगोली,19 ऑक्टोबर: नागरिकांची संपत्ती आणि जीवाची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, नागरिकांची सुरक्षा करण्याची अपेक्षा असणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चक्क पोलीस ठाण्यातच चोरट्यानी हात साफ केले आहेत. पोलीस ठाण्यात चोरी होत असेल तर नागरिकांची सुरक्षा पोलीस कसे करणार,असा सवाल जणमाणसातून उपस्थित होत आहे.

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे पोलीस स्टेशनमधून दारूच्या बाटल्यांची चोरी झाली आहे. अकोला ते नांदेड या वर्दळीच्या रस्त्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये 24 तास पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हजार असतात. हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई करत देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. यामध्ये 16 ऑक्टोबर सायंकाळी 6 ते 18 ऑक्‍टोबरला सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मुद्देमाल कक्षाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आणि वाकून मुद्देमाल कक्षात प्रवेश करून 60 हजार रुपये किमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स आणि 14 हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या 64 बाटल्या लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चक्क पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची लाजिरवाणी घटना घडल्यानंतर या संबंधी पोलीस विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. याप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...