Home /News /maharashtra /

जालना पोलिसांचा AIR STRIKE, हातभट्टीचे अड्डे केले उद्ध्वस्त

जालना पोलिसांचा AIR STRIKE, हातभट्टीचे अड्डे केले उद्ध्वस्त

भारतीय सेनेचा 'एअर स्ट्राईक पॅटर्न' वापरत पोलिसांनी चक्क हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

    विजय कमळे पाटील, जालना, 9 जानेवारी : भारतीय सैनिकांनी एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र जालना पोलिसांनी देखील आता भारतीय सेनेचा हा 'एअर स्ट्राईक पॅटर्न' वापरत चक्क हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. जालना शहरातील कैकाडी मोहल्ला आणि कुंडलिका नदी परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूचे अड्डे चालवले जातात. मात्र, कैकाडी मोहल्ल्यात दाट लोकवस्ती आणि कुंडलिका नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे असल्याने या ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई करण्यात पोलिसांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पोलिसांनी थेट एअर स्ट्राईकचा आधार घेत कारवाई केली आहे. माणुसकीला काळीमा! साखर झोपेत असलेल्या तरुणाला जिवंत जाळलं जालना येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नव्यानेच रुजू झालेल्या परिविक्षाधीन आयपीएस पोलीस अधिकारी निलेश तांबे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की कैकाडी मोहल्ला आणि कुंडलिका नदी परिसरात परत हातभट्टी दारूचे अड्डे बनविण्यात आले आहेत. या माहितीच्या आधारे सदर दारू अड्ड्यांवर कारवाई करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी भारतीय सेनेचा एअर स्ट्राईक पॅटर्न वापरण्याचं ठरवलं. लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप पोलीस विभागातील ड्रोन कॅमेरामन गणेश वाघ यांना पाचारण करण्यात आलं. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं परिसरात कुठे कुठे हठभट्टी दारूचे अड्डे सुरू आहेत, याचं चित्रण करण्यात आलं. ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या पथकांनी परिसरातील दोन हठभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त केले आहेत. जालना पोलिसांनी वापरलेल्या या एअर स्ट्राईक पॅटर्नमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळात देखील अश्याप्रकारे ड्रोनच्या साह्याने इतर अवैध धंद्यांवर देखील कारवाई करण्याचा जालना पोलिसांचा मानस आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Jalna, Jalna news, Jalna police

    पुढील बातम्या