मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जालन्यात कोरोनाग्रस्तांसाठी सगळ्यात अनोखी टॅबलेट, रुग्ण आणि नातेवाईक दोघांनाही दिलासा

जालन्यात कोरोनाग्रस्तांसाठी सगळ्यात अनोखी टॅबलेट, रुग्ण आणि नातेवाईक दोघांनाही दिलासा

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे.

जालना कोविड रुग्णालयात एका अशा टॅबलेटचा वापर केला जातोय ज्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांना देखील मोठा मानसिक दिलासा मिळत आहे.

जालना, 21 ऑगस्ट : कोणताही आजार असो त्याच्या उपचारात टॅबलेटची महत्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे रुग्ण आणि टॅबलेट यांच्यात अतूट असतं असं म्हणायला हरकत नाही. संपुर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातलं असून कोरोनावरील टॅबलेट (औषधं) बनवण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, जालना कोविड रुग्णालयात एका अशा टॅबलेटचा वापर केला जातोय ज्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांना देखील मोठा मानसिक दिलासा मिळत आहे. आजारी माणसाला रुग्णालयात उपचार घेत असताना नातेवाईकांच्या सोबतीने किंवा बोलल्याने मोठा धीर मिळतो तर नातेवाईकदेखील आपल्या रुग्णासोबत बोलून त्याच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेत असतात. मात्र, कोरोनाच्या या संसर्गजन्य रोगामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईक एकमेकांना भेटू शकत नाही, सोबत राहू शकत नाही. कुटुंबात एखादा व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह आला रे आला की त्याच्या संपर्कातील सर्वांनाही ताबडतोब क्वारंटाईन केलं जातं. कोरोनाच्या भीतीपोटी इतर नातेवाईक किंवा मित्रमंडळी देखील त्यांच्यापासून हाताचं अंतर ठेवतात. तर काही आप्तेष्ट इच्छा असून देखील कोरोना रुग्णांशी बोलू किंवा त्यांना भेटू शकत नाही. एकटं पडल्याने रुग्ण भीतीपोटी मानसिकदृष्ट्या अधिकच खचून जातो. मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, घटनेचा 'Exclusive Video' समोर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या असह्य कोरोना रुग्ण आणि नातेवाईक यांच्यातील दुरावा दूर करून त्यांच्यात संवाद घडवून आणण्यासठी जालना जिल्हा कोविड रुग्णालयात एक आगळंवेगळं उपक्रम राबवण्यात येतो आहे. यासाठी कोविड हेल्प डेस्कवर एक आणि कोरोना वार्डात एक असे दोन इलेक्ट्रॉनिक टॅबलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या टॅबलेटच्या माध्यमातून कोरोना वार्डातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकमेकांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधतायेत. नातेवाईक आपल्या रुग्णासोबत बोलून त्यांची विचारपूस करून त्यांना धीर देत आहेत तर रुग्णदेखील नातेवाईकांशी बोलून त्यांना आपल्या तब्येतीची आणि उपचाराबाबत माहिती देताहेत. व्हिडिओ कॉलवरून संभाषण होत असल्याने रुग्णाची आणि रुग्णालयाची वास्तविक परिस्थिती याची पारदर्शकता अनुभवायला मिळते आहे. गणेशोत्सवावर असणार पावसाचं संकट, या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस यावेळी रुग्ण आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आनंद आणि समाधान पाहायला मिळतो आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉल करून संभाषणाच्या उपक्रमामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत असल्याचं नातेवाईचं म्हणणं आहे. जालन्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्ण आणि नातेवाईक यांच्यातील दुरावा दूर करून त्यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी राबविला जात असलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून कोरोनवरील औषधीची टॅबलेट येईल. तेव्हा येईल पण तूर्तास तरी जालना जिल्हा कोविड रुग्णालयात वापरली जाणारी ही इलेक्ट्रॉनिक टॅबलेट मात्र, इतर जिल्ह्यांनी देखील वापरण्यास काही हरकत नाही.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या