Home /News /maharashtra /

धावत्या एसटी बसमध्येच 50 वर्षीय व्यक्तीची विष प्राशन करून आत्महत्या, प्रवाशांमध्ये खळबळ

धावत्या एसटी बसमध्येच 50 वर्षीय व्यक्तीची विष प्राशन करून आत्महत्या, प्रवाशांमध्ये खळबळ

एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला आहे.

    जालना, 4 जानेवारी : गेवराई येथून एसटी बसमधून प्रवास करत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही. अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड इथं जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसला. बस अंबडजवळ पोहोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याचं आणि एक प्रवाशी गंभीर असल्याचं इतर प्रवाशांनी चालक-वाहकाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं लक्षात आलं. धावत्या बसमध्येच सदर इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने इतर प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र चालक आणि वाहकाने सर्वांना सावरलं आणि बसमधील इतर प्रवाशांच्या मदतीने सदर इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे दाखल आलं. मात्र त्या व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याने प्राण सोडले. सदर इसमाची ओळख अद्याप पटू शकली नसल्याने या प्रकरणाबाबत संभ्रम आणखीनच वाढला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर बसमध्ये एकच खळबळ उडाली. सदर इसमाने बसमध्येच विष प्राशन करून आत्महत्या का केली आणि ती व्यक्ती नेमकी कोणत्या शहरातील होती, याबाबतची ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
    First published:

    Tags: Marathwada, St bus

    पुढील बातम्या