विधानसभा 2019: जागावाटपावरून 'वंचित'मध्ये उभी फूट? वाचा काय म्हणाले खासदार जलील

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून 'वंचित'मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटपावरून चिंतेच वातावरण तयार झालाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:14 PM IST

विधानसभा 2019: जागावाटपावरून 'वंचित'मध्ये उभी फूट? वाचा काय म्हणाले खासदार जलील

सिद्धार्थ गोदाम, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 20 ऑगस्ट- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून 'वंचित'मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटपावरून चिंतेच वातावरण तयार झालाय. वंचित आम्हाला आमच्या जागांबद्दल अजून काही बोलायला तयार नाही म्हणून आम्हाला आता काळजी वाटायला लागली, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलं आहे. एमआयएमच्या वतीने आम्ही ज्या जागा आम्हाला पाहिजे, त्याची यादी वंचितच्या कोअर कमिटीला दिली आहे. तीन दिवसांत जागा देण्याचे वंचितच्या कोअर कमिटीने सांगितले होते. मात्र, अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे आम्ही आता काळजीत पडलो, अशीही जलील यांनी सांगितले आहे. लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटून जागा वाटपाची मागणी करणार असल्याचेही खासदार जलील यांनी सांगितले. दरम्यान, आता याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणणार, काँग्रेस राहणार का वंचित?

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी आता काँग्रेसला नवी ऑफर दिलीय. विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्या अशी ऑफर आंबेडकरांकडून देण्यात आलीय. तर उर्वरीत 144 जागा वंचित बहुजन आघाडी लढवेल, असं आंबेडकरांनी सांगितलं. याआधी जुलै महिन्यात आंबेडकरांनी काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली होती. त्यानंतर वंचित ही भाजपची बी टीम आहे. या काँग्रेसच्या आरोपांचा हवाला देत, काँग्रेस या आरोपांवर खुलासा करत नाही तोवर त्यांच्याशी आघाडीची चर्चा करणार नाही अशी भूमिका आंबेडकरांनी स्वत:च पत्रकार परिषदेत मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा आंबेडकरांनी काँग्रेसला थेट 144 जागांची ऑफर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणून धरणार असून आघाडी शक्यच नसल्याचं बोललं जातंय.

वंचितची ही ऑफर काँग्रेस स्वीकारणं शक्यच नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वंचितकडे विजयी होण्याची शक्ती नसली तरी आघाडीच्या उमेदवारांना पाडण्याची ताकद आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीत किमान 5 ते 6 जागांवर वंचितमुळे काँग्रेसचे उमेदवार पडल्याचं सिद्ध झालंय. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना लाखाची मतं पडली होती. विधानसभेत तर मतांचं अंतर आणखी कमी होते. त्यामुळे यावेळी किती फटका बसतो यावर मोठं गणित अवलंबून आहे.

औरंगाबाद विधानपरिषद : काँग्रेसच्या बंडखोर नेत्यामुळं 'युती'चा विजय पक्का

प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छा नाही. ते फक्त चर्चेचा देखावा उभा करत असल्याची काँग्रेसची भावना आहे. त्यामुळे वंचितकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचं काँग्रेसचं धोरण असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसची वंचितसोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फिट्टी-फिट्टीचा फॉर्मुला ठरल्यामुळे आपल्या वाट्याच्या जागा काँग्रेसला वंचितसाठी सोडाव्या लागतील. प्रकाश आंबेडकरांची आत्ताची भूमिका ही काँग्रेससाठी पुरक नसल्याने तेही चर्चेत फार वेळ घालणार नसल्याचे संकेत आहेत.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...