बीड: भर रस्त्यात महिलांना अमानुष मारहाण, मुलीचा आक्रोश ऐकून दगडालाही फुटेल पाझर VIDEO

बीड: भर रस्त्यात महिलांना अमानुष मारहाण, मुलीचा आक्रोश ऐकून दगडालाही फुटेल पाझर VIDEO

या घटनेमुळे बीडमधल्या महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. स्त्री भ्रूण हत्येमध्येही बीडचा राज्यात वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

बीड 21 ऑक्टोबर: महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांवरून देशभर संताप आहे. दररोज महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. असं वातावरण असताना बीडमधली संतापजनक घटना पुढे आली आहे. एकाच कुटुंबातील तीन महिलांना मारहाण, किरकोळ वादातून अमानुष मारहाण करण्यात आली. भर रस्त्यात महिलांना लोखंडी सळई, लाठी- काठी आणि बॅटने अमानुष मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

बीड शहरातील महात्मा फुले नगर मधील धक्कादायक घटना आहे. माणसं महिलांना मारत असताना एका महिलेच्या मुलीने आक्रोश केलाय. आपल्या आईला अमानुष मारहाण होत असल्याने मुलीने हंबरडा फोडला. एवढ्या आकांताने ती रडत होती की दगडालाही पाझर फुटला असता. मात्र मारणाऱ्या त्या पाषाणह्रदयी माणसांना मात्र पाझर फुटला नाही. त्यांनी मारहाण सुरूच ठेवली.

या घटनेमुळे बीडमधल्या महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. स्त्री भ्रूण हत्येमध्येही बीडचा राज्यात वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

महिलेच्या अंगावर बसून मारहाण करण्यात आली. पीडित महिला गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर जिल्हा रुगणालाय उपचार सुरू आहेत.

या आधीही बीडमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. आरोपींना कठोर शासन झाल्याशीवाय या घटना थांबणार नाहीत असं महिला संघटनांनी म्हटलं आहे.

राज्यात तयार होतोय नवा कायदा

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आणि हिसांचारात वाढ होत आहे. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आता महाराष्ट्रात नवा कायदा करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महिलांना सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' तयार होत असून हा कायदा लवकरच संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

दिशा कायद्याच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. महिला संघटना तसेच  तज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्यात येणार आहे अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी बोलतांना दिली. सर्व सूचनांचा विचार करून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 21, 2020, 10:25 PM IST
Tags: beed

ताज्या बातम्या