हा विश्वविजेता पैलवान चढणार बोहल्यावर.. गुरु काकासाहेबांचा होणार जावई

महाराष्ट्राचा लाडका मल्ल, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता, पोलीस उपअधीक्षक (Dysp)राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 10:04 PM IST

हा विश्वविजेता पैलवान चढणार बोहल्यावर.. गुरु काकासाहेबांचा होणार जावई

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,3 ऑक्टोबर: महाराष्ट्राचा लाडका मल्ल, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता, पोलीस उपअधीक्षक (Dysp)राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. येत्या 9 ऑक्टोबर 2019 रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आवरे कुटुंबाने दिली आहे. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी राहुल आवारे यांचा विवाह निश्चित करण्यात आला आहे.

अर्जुनवीर काकासाहेब पवार हे राहुल आवारे याचे गुरु असून स्व. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर राहुलवर पुत्रवत प्रेम त्यांनी केले. राहुल आवारे याने नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक इतिहास रचला. महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम वर्ग नोकरी प्रदान करुन त्याच्या कारकीर्दीला गौरव यापूर्वीच केला आहे. राहुल सध्या पोलीस उपअधीक्षकाचे प्रशिक्षण घेत आहे.

राहुल आवारे याच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र तसेच देशातील कुस्तीप्रेमींना राहुलच्या लग्नाची बातमी नक्कीच आनंद देणारी आहे. आता आवारे व पवार घराणे आता नातेसंबंधात बांधले जाणार हे सुद्धा चित्र सर्वाना आनंदित करणारे आहे. राहुल आवारे व ऐश्वर्या पवार यांच्या साखरपुडा लवकरच पार पडणार आहे.

चोर तो चोर वर शिरजोर, भररस्त्यावर महिलेनं केली पोलिसांना मारहाण, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...