घबाड सापडणार? मराठवाड्याच्या अनेक शहरांमध्ये 'खासगी क्लासेस'वर Income Taxच्या धाडी!

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या क्लासेसनी समांतर शिक्षण व्यवस्थाच उभारल्याचं उघड झाल्याने Income Tax ने धाडी घातल्याचं बोललं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 05:23 PM IST

घबाड सापडणार? मराठवाड्याच्या अनेक शहरांमध्ये 'खासगी क्लासेस'वर Income Taxच्या धाडी!

नांदेड 18 सप्टेंबर : मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचं प्रचंड पीक आलंय. हजारो मुलं कॉलेजेसमध्ये न जाता या क्लासेसमध्ये जात असतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होत असून या क्लासेसनी त्याचं एक जाळच उभं केलंय. याच क्लासेसवर Income Tax विभागानं धाडी घातल्या असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय. तर अनेक खासगी शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले आहे. या क्लासेसनी समांतर शिक्षण व्यवस्थाच उभारल्याचं उघड झाल्याने Income Tax ने धाडी घातल्याचं बोललं जातंय. नांदेड आणि लातूर शहरात या धाडी घालण्यात आल्या आहेत.

लातूर - आयकर विभागाने(Income Tax) आज लातूर शहरातील अनेक खासगी क्लासेसवर धाडी घातल्या. Income Tax च्या पथकाने  मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी टाकल्या. धाडीत इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी व त्यांच्या दिमतीला पोलिसांचा  फौजफाटा होता. यामुळे खाजगी क्लासेसने  आपल्या नियमित वर्गांना आज आज सुट्टी दिली होती. लातूर शहरात राज्यातील व परराज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विषयाच्या तयारीसाठी लातुरात क्लासेसचं मोठं प्रस्थ निर्माण झालंय. त्यात क्लासेसचे शुल्क भरमसाठ आहे. यामुळेच आयकर विभागाने आज खाजगी क्लासेसवर अनेक ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या.

मुख्यमंत्र्यांच्या 'टीम'मधील हा प्रशासकीय अधिकारी उतरला राजकारणाच्या आखाड्यात

नांदेड  शहरातीलही काही खाजगी कोचिंग क्लासेसवर Income Taxने आज धाडी टाकल्या. पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाने ह्या धाडी टाकल्या आहेत. या धाडीमुळे खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांना ऐनवेळी सुट्टी दिलीय. औरंगाबाद येथील आयकर खात्याचं पथक नांदेड मध्ये ठाण मांडून बसलंय.

शरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल!

Loading...

शहरात असणाऱ्या सर्वच खाजगी कोचिंग क्लासेस सध्या आयकर खात्याच्या रडारवर आहेत. शहरातील मोटेगावकर कोचिंग क्लासेस, क्रेटिव्ह कोचिंग क्लासेस, आयआयबी आणि मुंडे कोचिंग क्लासेसमध्ये आयकर विभागाच्या पथकांनी झडती घेतली. या धाडींबाबात अधिकृत माहिती सांगितली जात नसली तरी तपास अधिकाऱ्यांना मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...