...तर शिवसेनेला धडा शिकविणार, भाजप खासदाराची थेट धमकी

'गद्दारी केल्याचं सांगत शिवसेना डिवचणार असेल तर शिवसेनेला धडा शिकविल्याशीवाय राहणार नाही.'

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 04:17 PM IST

...तर शिवसेनेला धडा शिकविणार, भाजप खासदाराची थेट धमकी

मुजीब शेख, नांदेड 01 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीचं जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता बंडखोरीला उधाण आलंय. युतीचं जागावाटप जाहीर झालं आणि नाराजीचे सूर उमटले. लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसलाय. लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडून भाजपला मिळेल अशी त्यांना आशा होती. त्या जागेवर आपल्याला मुलाला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र लोहा ही जागा शिवसेनेकडेच कायम असून तिथे उमेदवारही त्यांनी निश्चित केलाय. त्यामुळे संतापलेल्या चिखलिकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकीच दिलीय. खासदार प्रताप पाटिल चिखलीकर हे 2019 पर्यंत शिवसेनेचेच आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. याचा शिवसेनेला राग आल्याचं बोललं जातं.

भाजपच्या पहिल्या यादीतले 'हे' आहेत नवीन चेहेरे!

चिखलीकर यांनी सेनेशी गद्दारी केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी सेनेने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला. शिवसेनेकडून लोह्यात मुक्तेश्वर धोंडगे यांचं तिकीट निश्चित मानलं जातंय. शिवसेनेने केवळ मी भाजपमध्ये गेल्याने आपल्या मुलाचा पत्ता कापला असेल तर शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच प्रताप पाटील चिखलिकर यांनी दिलाय.

मुलगा प्रविण चिखलीकर यांना या जागेवरून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. आता चिखलिकर समर्थक खवळले असून लोह्यामधून प्रविण चिखलिकर यांनी अपक्ष म्हणून लढावं अशी मागणी केलीय. असं असेल तर शिवसेनेचे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होणार असल्याची धमकीच खा. चिखलीकरांनी दिलीय. त्यामुळे नांदेडमध्ये आता चिखलीकर विरुध्द शिवसेना असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय';खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Loading...

असं आहे भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला 20 दिवस राहिले असताना भारतीय जनत पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांना स्थान दिलंय. तर विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेत काही उमेदवारांबाबत लोकांचा नकारात्मक सूर आला होता. त्यामुळे अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. तर दिग्गज उमेदवारांमध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, कोथरूड - चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आलीय. या यादीत अनेक नवे चेहेरे असून भाजपने डावपेच आखत डाव खेळलाय.

भाजप पाठोपाठ शिवसेना ही मैदानात; 70 जणांची पहिली यादी जाहीर!

महायुतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करतील असं असं सांगण्यात आलं होतं. मात्र बंडखोरीची शक्यता आणि अवघड प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी महायुतीची घोषणा पत्रकाद्वारेच करण्यात आली. तर जागावाटप करतानांही फार गाजावाजा करण्यात आला नाही. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजपला 146, शिवसेनेना 124 तर मित्र पक्षांना 18 जागा देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...