मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप

लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप

मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याची बातमी समोर आली आहे.

मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याची बातमी समोर आली आहे.

मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याची बातमी समोर आली आहे.

बीड, 06 जानेवारी : आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून 25 वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याची बातमी समोर आली आहे. शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव आहे. जिजाबाचे आई-वडील ऊसतोडनीला कोल्हापूरला गेले असताना त्याला गावाकडे बोलावून मारहान करत विष पाजल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मयताच्या अंगावर मारहान केल्याचे वळ असायची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. विष पाजल्यानंतर जिजाबा याला तात्काळ जिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं अखेर त्याचा आज मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या - 'मातोश्री'वर पाय ठेवताच खैरेंनी 'गद्दार' म्हटलेल्या सत्तारांबरोबर केलं मनोमीलन

विष पाजून खून केल्याचा मयताच्या आई वडिलांसह नातेवाईकांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील धूमेगावातील घटना आहे. आरोपींना अटक करण्यासाठी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 3 तास ठिय्या आंदोलन केलं. आरोपीला अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यासही नकार दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस कसून तपास करत असून जिजाबाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलीस नातेवाईकांची शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण अशा प्रकार तरुण मुलाला गमावल्यामुळे संपूर्ण कुलाळ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या - फडणवीस सरकारला जमलं नाही ते ठाकरे करून दाखवणार, मराठी भाषेवर मोठा निर्णय

First published:

Tags: Beed, Beed murder case