धक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय

सरकारी हॉस्पिटलच्या तुलनेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 06:47 PM IST

धक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय

सुरेश जाधव, अंबाजोगाई 25 ऑगस्ट : ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांचे गर्भाशय काढल्या संदर्भातल्या घटना उघड झाल्या होत्या. हा विषयात विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. या बाबतीत विधिमंडळ चौकशी समितीने बीड जिल्ह्यातील महिलांसोबत संवाद साधून माहिती घेतलीय. या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघडकीस आलीय.  या संबंधीचा अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे. सर्वेक्षणात सर्वच 82 हजार 900 ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीय.

राहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत

बीड जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचे समोर आले होते. काही खासगी रुग्णालयांनी अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया केल्याचेही काही प्रकरणांत समोर आले होते  त्यानंतर, राज्य सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती या समितीने दोन महिन्यापूर्वी बीडमधील महिलांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिकांशी बोलून अडचणी व उपाययोजना जाणून घेतल्या होत्या.

VIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान

चौकशी समितीने जिल्ह्यातील ऊसतोडणीला जाणाऱ्या महिलांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर, आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन ऊसतोडणी महिलांची माहिती घेण्यात आली. कधी व कोठे गर्भपिशवी काढली, याचा तपशील अहवालात आहे. अहवाल चौकशी समितीकडे पाठविण्यात आलाय. अहवालाचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

Loading...

राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसे आक्रमक, वाढवलं सरकारचं टेन्शन

सरकारी हॉस्पिटलच्या तुलनेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आलं आहे. त्यात बीड शहरातील 7, केजमधील 1 आणि इतर ठिकाणची दोन रुग्णालये असल्याचं सांगण्यात आलंय. या 10 खासगी रुग्णालयांमध्येच जवळपास 6 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षण केलेल्या 82 हजार 900 महिलांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: uterus
First Published: Aug 25, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...