जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सुरु होते 'हे' कृत्य, आक्षेपार्ह अवस्थेत सापडली महिला

पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता चौकशी केल्याचे सांगून या आंबटशौकिनांना सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 10:20 AM IST

जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सुरु होते 'हे' कृत्य, आक्षेपार्ह अवस्थेत सापडली महिला

बीड, 6 नोव्हेंबर: शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 6 च्या छतावरून एका महिलेसह दोन पुरुष आक्षेपार्ह कृत्य करताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तिघांना पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता चौकशी केल्याचे सांगून या आंबटशौकिनांना सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एका सरकारी रुग्णालयाच्या छतावर गैरप्रकार होत असतानाही आरोपींवर कुठलीही कारवाई केली गेली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे प्रकरण?

जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 6 च्या छतावर सोमवारी पहाटे एक महिला व दोन पुरुष आक्षेपार्ह कृत्य करत असल्याची माहिती रुग्णालय कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी छतावर जाऊन पाहिले असता महिलेसह पुरुषांना रंगेहात पकडले. नंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. शहर पोलिसांनी रुग्णालयात येऊन महिलेसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले. या वेळी छतावर दारूच्या बाटल्या व इतर साहित्यही आढळले. मात्र, या लोकांबाबत तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

काय म्हणाले पोलिस?

रुग्णालयातून फोन आल्यानंतर शहर पोलिसांनी महिलेसह तीन जणांना ताब्यात घेतले होते. महिलेने कोणतीही तक्रार न दिल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती बीड शहर पोलिस स्टेशनचे एपीआय घनश्याम अंतराप यांनी दिली आहे.

Loading...

सुरक्षा कुचकामी...

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा कुचकामी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वाहन चोरी असो की चोऱ्यांच्या घटना सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. रुग्ण, नातेवाइकांना पास देण्यात येत नसल्याने नेमका कोणता व्यक्ती कशासाठी रुग्णालयात आला हेही माहिती मिळत नाही.

VIDEO : आठवलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट, केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...