'तलाक' घेतल्यानंतर वंचित आणि MIM पुन्हा एकत्र येणार?

'तलाक' घेतल्यानंतर वंचित आणि MIM पुन्हा एकत्र येणार?

' माझी काय चूक झाली ती मला काळाली तर मी बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागेल. ते मला मोठ्या भावासारखे आहेत.'

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 19 सप्टेंबर : लोकसभेतल्या कामगिरीने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत काही दिवसांपूर्वीच फुट पडली होती. जागावाटपावरून मतभेद झाल्याने MIMने प्रकाश आंबेडकरांशी काडीमोड घेतला होता. हा राजकीय तलाक घेतल्यानंतर आता पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी त्याबाबतचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जर असादुद्दीन ओवेसी यांचा फोन उचलला तर पुन्हा  दोन्ही पक्ष एकत्र येवू शकतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं. हा राजकीय तलाक घेताना जलील यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकाही केली होती.

मात्र आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मवाळ केले. जलील म्हणाले, माझी काय चूक झाली ती मला काळाली तर मी बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागेल. बाळासाहेब आंबेडकर यांनी आताही मोठ्या भावाच्या नात्याने मला शिव्या जरी घातल्या तरी मी त्या सहन करेल असंही ते म्हणाले. त्यामुळे वंचितचं पुन्हा जुळणार का अशी चर्चा आता सुरू झालीय.

शिक्षिकेशी अश्लिल कृत्य करतो म्हणून रद्द केला होता प्रवेश, संस्थाचालकावर गुन्हा

नारायण राणेंचा सस्पेन्स कायम

राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,' असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या 5 किटकनाशकांवर बंदी

नितेश राणेंनी भूमिका बदलली?

'नाणार रिफायनरीबाबत आजही आपण जनतेच्या सोबत असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता म्हणूनच आम्हीही विरोधात होतो. पण आता लोकांचं म्हणणं काही वेगळं असेल तर लोकांशी चर्चा करूनच आपण तशी पावलं टाकू,' असा पवित्रा आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यानी राजापूरचा सभेत केलेल्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी ही सावध प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आधी नाणारवरून आक्रमक भूमिका घेणार नितेश राणे मवाळ कसे झाले, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...