पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले 10 दिवस

पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले 10 दिवस

माणुसकीला काळिमा फासणारी घटना माजलगाव शहरातील अशोकनगर भागात सोमवारी उघडकीस आली.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड, 9 डिसेंबर: माणुसकीला काळिमा फासणारी घटना माजलगाव शहरातील अशोकनगर भागात सोमवारी उघडकीस आली. सकाळी नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तपास लावला. समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले आहेत. पतीनेच राहत्या घरात पत्नीची नऊ दिवसांपूर्वी निर्घृण हत्या केली. तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आले. आरोपी पतीने सोमवारी कमरेपासून वरचा उरलेला अर्धवट सांगाडा नाल्याच्या काठावर जाळून नष्ट करण्याचा प्रयत्नं केला. मात्र अर्धवट जळलेल्या सांगाडयामुळे ही हत्या उघड झाल्याचे समोर आले.

रेश्मा संजय साळवे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले रेश्माच्या शरीराचे इतर तुकडे जप्त केले आहेत. या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे.

मिळालेली माहिती अशी की, संजय काही काम करत नाही, यावरून पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होते. 19 नोव्हेंबरला दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या संजयने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत रेश्मा हिने 26 नोव्हेंबर रोजी माझ्यासह मुलांना पतीपासून धोका असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर रेश्माला आपला प्राण गमवावा लागला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

माजलगाव शहरात अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेम होते. त्यांनी घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने रहात होता. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहे. पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी चक्रे फिरवून संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यातून त्याने आठ दिवसांपूर्वी (30 नोव्हेंबर) रेश्मा कत्तीने हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. घरात दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी फ्रीज उघडून पाहिले असता रेश्माच्य शरीराचे मरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading