दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गेली होती सासरी.. पतीनेच केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गेली होती सासरी.. पतीनेच केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

दिवाळीसणाच्या तोंडावर क्षुल्लक कारणावरून पतीने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना

  • Share this:

बीड,26 ऑक्टोबर: दिवाळीसणाच्या तोंडावर जिल्ह्यातील माजलगाव येथे क्षुल्लक कारणावरून पतीने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरकी लिमगाव येथे ही घटना घडली आहे. जयश्री गणेश जगधने असे मृत महिलेचे नाव आहे.

'तुला काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही.', असे म्हणून पतीने तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीची गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती गणेश सर्जेराव जगधने, सासरा सर्जेराव सटवाजी गजधने, सासू मुक्ताबाई सर्जेराव जगधने, दीर महेश सर्जेराव जगधने, ज्योतीराम नवनाथ जगधने, तुकाराम जगधने यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

फेब्रुवारी विवाह... ऑक्टोबरमध्ये हत्या

मिळालेली माहिती अशी की, रामप्रसाद विठोबा हालबुर्गे (रा. केकर जवळा, ता. मानवत) यांची मुलगी जयश्रीचा विवाह फेब्रुवारी महिन्यात माजलगाव तालुक्यातील हारकी लिमगाव येथील गणेश सर्जेराव जगधने याच्याशी झाला होता. लग्नानंतर तिला दोन-तीन महिने चांगले नांदवले. त्यानंतर मात्र, तुला काम करता येत नाही, स्वयंपाक नीट करता येत नाही, असे म्हणून सासरच्या लोकांनी जयश्रीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. ही बाब जयश्रीने आपल्या आई, वडिलांना माहेरी गेल्यानंतर सांगायची. मी नांदायला जाणार नाही म्हणून ती दोन महिने माहेरी राहिली.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गेली होती सासरी...

जयश्रीला आता आम्ही चांगले नांदवू, असे सांगून सासरा सर्जेराव जगधने यांनी तिला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सासरी नांदायला आणले. गुरुवारी जयश्रीचा चुलत दीर ज्योतीराम जगधने याने तिच्या माहेरी फोन लावून तुमची मुलगी बेशुद्ध आहे. तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे रामप्रसाद हे गावातील लोकांसह माजलगावात आले असता त्यांना मुलगी जयश्री मृत झाल्याचे आढळून आले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जयश्रीचा सासरच्या मंडळींनी खून केल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

First published: October 26, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading