हिंगणघाट पीडित युवतीचं मेडिकल बुलेटिन, डॉक्टरांनी व्यक्त केली 'ही' भीती

हिंगणघाट पीडित युवतीचं मेडिकल बुलेटिन, डॉक्टरांनी व्यक्त केली 'ही' भीती

हिंगणघाट येथील पीडित युवती अजूनही क्रिटिकल अजून इन्फेक्शन होण्याची भीती डॉ. दर्शन रेवनवार व्यक्त केली आहे.

  • Share this:

वर्धा, 06 फेब्रुवारी : औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. पीडितेच्या मृत्यूमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. तर हिंगणघाट इथली पीडित प्राध्यापिका अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हिंगणघाट येथील पीडित युवती अजूनही क्रिटिकल अजून इन्फेक्शन होण्याची भीती डॉ. दर्शन रेवनवार व्यक्त केली आहे. पीडितेची प्रकृती स्थिर आहे पण चिंताजनक आहे. शुक्रवारी तिची सर्जरी करणार करण्यात येणार असून अद्याप तिने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या नसल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉ. राजेश अटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तिच्या सर्जरीमध्येही कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता आहे तर संसर्गदेखील होऊ शकतो. शुक्रवारी तिची ड्रेसिंग करण्यात येणार असून आज तिला रक्त देण्यात येणार आहे. प्रोटीनचा लॉस नको म्हणून औषधे देण्यात येत आहेत. तर घशाची सूज कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या - डोंबिवली हादरली, रेल्वे ग्राऊंडजवळ सुटकेसमध्ये सापडला पुरुषाचा मृतदेह

जळीत प्रकरणामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. फुफ्फुसात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्वचा जाळल्यानेदेखील संसर्ग होऊ शकतोय तर हृदयाची गती वाढली आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने तिची काळजी घेण्यात येत आहे.

डॉ. अनुप मरार यांनीदेखील पीडितेच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. एक संपूर्ण आईसीयू युनिट केवळ या पीडितेसाठी राखीव करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी विशेष नर्स ठेवण्यात आल्या आहेत. युनिटमध्ये कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळे येणाऱ्यांना विनंती आहे की रुग्णाला भेटण्याची मागणी करू नये असं त्यांनी जाहीर सांगितलं आहे.

इतर बातम्या - रनवेवर घसरून विमानाचे झाले 3 तुकडे, 183 प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू

हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक

हिंगणघाट येथील प्राध्यापिका आणि औरंगाबाद येथल्या महिला जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरात सर्वपक्षीय मोर्चा व कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयाचे विध्यार्थी तसेच सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरणार आहे.

औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. यात महिला 95 टक्के भाजली होती. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 95 टक्के भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इतर बातम्या - तो पुन्हा आला! महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाला सुरुवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hinganghat
First Published: Feb 6, 2020 12:18 PM IST

ताज्या बातम्या