परभणीत पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव!

पावसाने पुनरागमन केल्याने, सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार निर्माण झालंय, लागोपाठ दोन दिवसापासून पडलेल्या पावसाने गंगाखेड, पालम, पूर्णा परिसरातील नद्या, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 06:18 PM IST

परभणीत पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव!

परभणी, 3 सप्टेंबर : गेल्या महिनाभरापासून दडी दिलेल्या पावसाचं आगमन जिल्ह्यात झाल्यानं शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलाय. कारण पाऊस आला नसता तर पीकं करपून गेली असती. महिनाभरापेक्षा जास्त काळापासून पाऊसच नसल्यानं पीकांनी माना टाकल्या होत्या. आधीच दुष्काळ त्यामुळे याववर्षीचंही पीक हातचं जातं की काय असं वाटू लागल्याने शतेकऱ्यांचे धाबे दणाणले होते. पाऊस नसल्याने  गुरा ढोरांना हिरवं गवतही पुरेसं होत नव्हतं. पावसाळ्यात वैरण साठवून ठेवणं शक्य होत नसल्याने शेतकरी हे हिरव्या चाऱ्यावर अवलंबून राहत असतात. पण पाऊसच नसल्याने गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. आता पाऊस आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन केल्याने, सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार निर्माण झालंय, लागोपाठ दोन दिवसापासून पडलेल्या पावसाने गंगाखेड, पालम, पूर्णा परिसरातील नद्या, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. यामुळे पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा, पूर्ण क्षमतेने भरला असून, या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आलेत. गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय.

गर्दुल्या तरुणाने काढली छेड, महिला पोलिसांनी 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून दिला चो

या बंधाऱ्यातून 12. 63 घन मीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हे पाणी नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पाकडे येत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या छायेत असलेल्या, परभणी जिल्ह्यातील पालम तालुका आणि डिग्रस बंधारा कोरडाठाक पडला होता. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने त्याला काही प्रमाणात दिलासा दिला होता. पण त्यानंतर झालेल्या या पावसाने आता हा बंधारा भरला असून परिसरातील पाणी टंचाई दूर होणार आहे.

विदर्भातही पावसाचा अंदाज

Loading...

विदर्भात पुढचे दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज आहे, त्यानंतर चार- पाच दिवस पाऊस  कायम राहणार आहे. नागपूर हवामान विभागाने हा मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. विदर्भाच्या बऱ्याच भागात आज संततधार पावसाचा अंदाज आहे. आणि पुढचे काही दिवस अशाच प्रकारे पाऊस कायम राहणार आहे.

शिवसेना-भाजपवर पलटवार करण्यासाठी आघाडीची बैठक, रणनीती आखणार

विदर्भात सुरुवातीला पाऊस असला तरीही अद्याप नागपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रविवारी पाऊस दाखल झाल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी नागपुरात पाऊसच झाला नाही. मात्र, बुधवारी नागपुरात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.  विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होताच काल पासून नागपूर शहरात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...