बीड, 10 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाच्या मृतांच्या आकड्यांमुळे नागरिकांध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये अंबाजोगाईत 8 कोरोना मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
स्वाराती रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 8 रुग्णांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी सगळ्यांना एकाच सरणावर ठेवलं आणि अखेरचा अग्नी दिला. अंबाजोगाईतील मांडवा रोडवर न.प.च्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कोरोना किती भीषण आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल.
कोरोना प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट
एकीकडे बीड जिल्ह्यात मृत्यू दर चिंतेचा विषय ठरत आहे. कारण गेल्या 8 दिवसांत जिल्ह्यात 38 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 8 सप्टेंबर आठ दिवसांत जिल्ह्यात 38 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर एकूण 177 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 914 कोरोनाबाधीत आहे तर आतापर्यंत 4 हजार 110 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तब्बल 177 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
एकता कपूर पुन्हा वादात; वेबसीरिजमधील त्या दृश्यामुळे लोकांनी व्यक्त केला संताप
खरंतर, कोरोनाच्या या काळात माणूसकीची परीक्षा पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे अनेकांनी आपली माणसं गमावली तर काहींनी संपूर्ण कुटुंबच गमावली. त्यात मृत्यूनंतरही मृतदेहाचे हाल होत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या. यामुळे कोरोना आणखी किती भावनांशी खेळणार असाच प्रश्न समोर येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Lockdown