अजित पवारांना भेटवस्तू दिल्याने अधिकाऱ्याला बसला दंड! पाहा नेमकं काय घडलं...

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटवस्तू देणं अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. या भेटीची किंमत अधिकाऱ्याला भेटीपेक्षाही मोठ्या रकमेच्या दंडानं चुकती करावी लागली आहे.

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटवस्तू देणं अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. या भेटीची किंमत अधिकाऱ्याला भेटीपेक्षाही मोठ्या रकमेच्या दंडानं चुकती करावी लागली आहे.

  • Share this:
औरंगाबाद, 30 जानेवारी :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटवस्तू देणं अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. या भेटीची किंमत अधिकाऱ्याला दंडानं चुकती करावी लागली आहे. आता तुम्हाला वाटत असेल ही दंडात्मक कारवाई खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच केली असेल, तर तसं नाही आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी अधिकाऱ्यावर केली आहे. ...म्हणून करावी लागली कारवाई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. त्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही त्यांचं स्वागत करताना दिसले. अशा वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटवस्तू देण्यासाठी पुस्तक मागवलं. ठरल्याप्रमाणे विभागीय आयुक्तांपर्यंत हे पुस्तक पोहचलंही... उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे पुस्तक भेट देण्यासाठी आणलं होतं. परंतु, या पुस्तकाला प्लास्टिकचं आवरण लावण्यात आलं होतं. आता प्लास्टिक म्हटल्यावर कारवाई तर होणारच... आणि यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी ही कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर दंडाची पावती ही उपायुक्त रवी जगताप यांच्या नावावर तयार करण्यात आली. राज्यात प्लास्टिक बंदी असताना अधिकारी कायद्याचं पालन करत नसल्याने आयुक्तांनी आपल्या कारवाईची मालिका यावेळीही कायम ठेवली. या कारवाईमुळे ‘अधिकाऱ्यांनीच आधी प्लास्टिकचा वापर टाळावा, तरच सर्वसामान्य या कायद्याचं पालन करतील’, अशी तंबीच आपल्या अधिकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्र्यांचं स्वागत आणि शिवसैनिकावर कारवाई महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी प्लास्टिक वापराविरोधी नेहमीच कारवाई केली आहे. याआधीही त्यांचा कारवाईचा धडाका पाहायला मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असताना उत्साही शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी प्लास्टिकचं आवरण असलेलं पुष्पगुच्छ आणले होते. लातूरमधील रमेश पाटील आणि जालनामधील मनीष श्रीवास्तव यांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला. माझ्या स्वागतालाही प्लास्टिक नको!’ आयुक्त अस्तिककुमार पांडे यांच्या स्वागतासाठी आलेल्या नगर रचना विभागाच्या प्रमुखलाच प्लास्टिक गुंडाळलेला पुष्पगुच्छ आणला म्हणून पाच हजाराचा दंड केला होता. एक नगरसेविकेने सुद्धा प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली भेटवस्तू अस्तिककुमार यांना दिली आणि त्यांच्यावरही पाच हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठवाड्याची जिल्हावार आर्थिक नियोजनासंदर्भातली बैठक ते घेणार आहेत. या बैठकीला मराठवाड्यातील सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार आज औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम शेंद्रा येथील पंचतारांकित औद्योगिक वासहतीला भेट दिली. सर्व बैठकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदही घेणार आहेत.
First published: