पोट भरण्यासाठी जालन्याहून मुंबईत आलेल्या तरुणीवर चौघांकडून बलात्कार

पोट भरण्यासाठी जालन्याहून मुंबईत आलेल्या तरुणीवर चौघांकडून बलात्कार

मराठवाड्यातील दुष्काळमुळे पोट भरण्यासाठी मुंबईला पोहोचलेल्या एका तरुणीला आपलं सर्वस्व गमवावं लागलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 31 जुलै - मराठवाड्यातील दुष्काळमुळे पोट भरण्यासाठी मुंबईला पोहोचलेल्या एका तरुणीला आपलं सर्वस्व गमवावं लागलं आहे. मुंबईतील चेंबर येथे केटरींगचे काम करायला गेलेल्या तरुणीवर चार जणांनी बलात्कार केला, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. अत्याचारामुळे पीडितेचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यातील ही दुर्दैवी तरुणी... दुष्काळमुळे गावाकडे रोजगार नसल्याने मुंबईला केटरींगचे काम करण्यासाठी गेली होती. चेंबूरला ती भावाकडे राहून काम करीत होती. आठ दिवसांपूर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. रात्री ती परत आली आणि त्यानंतर ती घराबाहेर पडलीच नाही. तिला चालता फिरता येत नव्हते. म्हणून तिला वडिलांनी गावाकडे आणले.

गावाकडे आणल्यानंतर पीडितेची प्रकृती आणखीच बिघडली. तरुणीचा कमरेखालचा भाग लूळा पडला आहे. तिच्या वडिलांना तिला अर्धांगवायूचा झटका आल्याची शंका होती. मात्र, डॅाक्टरांनी तिची तपासणी करून तिला अर्धांगवायू झाला नसल्याचे निदान केले.

घाटी रुग्णालयातील डॅाक्टरांनी केला धक्कादायक खुलासा..

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात डॅाक्टरांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. अत्याचारामुळे पीडितेच्या गुप्तांगाच्या आत जखमा झाल्या आहेत. अखेर वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता चेंबूरमध्ये चार जणांनी अत्याचार केल्याचे तिने सांगितले. आता हे प्रकरण पोलिसांत गेले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पीडितेसोबत चेंबूरमध्ये काय झाले... तिच्यावर सामूहिक अत्याचार करणारे कोण आहेत...याचा खुलासा पोलीस तपासात होईल...पीडिता घाटी रूग्णालयात उपचार घेत आहे. डॅाक्टरांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच सर्व घटना समोर येण्यास मदत होईल. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. ती कुणाशीही बोलत नाही. तिला चालता येत नाही. ती मधूनच ओरडून उठते. तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुंबईत बेस्ट बसला लागली आग, दुर्घटनेचा पहिला VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: July 31, 2019, 7:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading