मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या.. या कारणावरून चाकूने केले चार वार

मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या.. या कारणावरून चाकूने केले चार वार

विद्या ही संध्याकाळी निलोफर शेख हिच्या घरी गेली होती.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,25 नोव्हेंबर: पैशाच्या वादातून एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीची चाकू भोसकून हत्या केली आहे. शहरातील अल्तमश कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली आबे. विद्या चंद्रकांत तळेकर (29) असे मृत महिलेचे नाव आहे. 8 महिन्यांपूर्वीच विद्याचे लग्न झाले होते. तर शकीला उर्फ निलोफर शेख असे आरोपी मैत्रिणीचे नाव आहे. विद्या आणि निलोफर या दोन्ही जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी निलोफर शेख हिला अटक केली आहे.

घरी भेटायला बोलावले...

मिळालेली माहिती अशी की, अल्तमश कॉलनीमध्ये रविवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. विद्या ही रविवारी संध्याकाळी निलोफर शेख हिच्या घरी गेली होती. घरी दोघीत चर्चा सुरू असताना त्यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की निलोफरने चाकूने विद्यावर चार वार केले. अचानक मान, कंबर, पोटात वार होताच विद्या कोसळली. निलोफरनेच तिला रुग्णालयात नेले. तोवर तिचा मृत्यू झाला.

पैशांच्या वादातून खून करण्यात आल्याचा आरोप विद्याच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु, खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहे. विद्या अनेकवेळा तिच्याकडे जात होती. तर या दोघी कित्येकदा एकाच बाइकवर फिरायलाही जायच्या. दरम्यान, निलोफर विवाहित असतानाही पतीपासून विभक्त एका भाड्याच्या घरात राहत होती. तर विद्या आपल्या पतीसोबत एसटी कॉलनीत राहत होती.

रुग्णालय परिसरात तणाव...

घटनेची माहिती कळताच दोघींचे कुटुंबीय रुग्णालयात आले. तणाव निर्माण झाला. सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी निलोफर व तिच्या मुलाला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक विजय पवार, दत्ता शेळके यांनी रुग्णालयात दाखल होऊन जमावाला पांगवले.

First published: November 25, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading