नांदेडमध्ये थरार...पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये कुख्यात गुंड शेरा ठार

नांदेडमध्ये थरार...पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये कुख्यात गुंड शेरा ठार

पोलीस शेराच्या मागावर गेली कित्येक दिवस होते. मात्र प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी होत असे. अखेर तो तावडीत सापडला

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड 4 नोव्हेंबर : नांदेडमध्ये आज थरार घडला. पोलिसांशी झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड शेरा मारला गेला. शेरा लपून बसला अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शरण येण्याचं आवाहन केलं मात्र त्याने उलट पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेरा ठार झाला. बारड शिवारातील एका आखाडयावर हा थरार घडला. शेरा आणि त्याचा साथीदार अजय ढगे या दोघांनी रविवारी रात्री पिस्तुलचा धाक दाखवून  श्रीनगर येथील मेट्रो शूज दुकान लुटले होते. आरोपींनी दुकान मालकाला पिस्तुल दाखवून  धमकावले आणि दुकानातील रोख 22 हजार रुपये आणि काही सामान असा 30 हजाराचा ऐवज लुटून नेला.

SPECIAL REPORT :...त्यात 'या' दोन जुळ्या लेकींचा काय दोष हो!

आपण शेराचे माणसं असल्याचे देखील त्यांनी दुकान मालकाला सांगितले होते. रविवारी रात्री पासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. अजय ढगेला पोलिसांनी अटक केली होती. तर शेरा सिंग उर्फ टायगर फरार होता. तो बारड शिवारातील आखाड्यावर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्या ठिकाणी पोहचले. शेरा ला शरण येण्याचे पोलिसांनी सांगितले, पण त्याने पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देत फायरिंग केलं यात शेरा उर्फ टायगर ठार झाला आणि नांदेडच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला.

लग्नानंतर झालेल्या छळाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या, जायकवाडी धरणात घेतली उडी

पोलीस शेराच्या मागावर गेली कित्येक दिवस होते. मात्र प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी होत असे. आज तो तावडीत सापडला आणि तडाखा बसला. शेराच्या नावावर अनेक गुन्हे दाखल होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 10:27 PM IST

ताज्या बातम्या