मित्रांच्या डोळ्यादेखत सहस्त्रकुंड धबधब्यात वाहून गेले 4 जण

मित्रांच्या डोळ्यादेखत सहस्त्रकुंड धबधब्यात वाहून गेले 4 जण

सहस्त्रकुंड धबधबा हा जरा खोल आणि दगडांमुळे खाचखळग्यांचा आहे. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्घटना घडतात.

  • Share this:

नांदेड 15 ऑक्टोंबर : नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात आज 4 मित्र वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आलंय. सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी हैदराबादमधून आठ पर्यटक सहस्त्रकुंड इथं आले होते. पैनगंगा नदी पात्रात अचानक पाण्याची वाढ झाली त्यामुळे धबधब्याचा प्रवाहही वाढला. त्यामुळे  चार पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले आहेत. त्यातील एकाला वाचवण्यात यश आलय तर तिघे अद्याप बेपत्ता आहेत. सहस्रकुंड धबधबा येथे ही घडली आहे. हे आठही पर्यटक तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस सुत्राकडून कळतेय. रफीयोद्दीन, आक्रम, सोहेल आणि नद्दीम हे नदीपात्रात वाहुन गेलेल्यांची नावे असून नद्दीम नावाचा पर्यटक वाचला असुन‌ रफीयोद्दीन, आक्रम, सोहेल हे अद्याप बेपत्ता आहेत. नदी पात्रात वाहुन गेलेल्या पर्यटकांचा शोध घेणे सुरु असल्याचे माहिती इस्लापूर पोलिसांनी दिलीय.

लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना

सहस्त्रकुंड धबधबा हा जरा खोल आणि दगडांमुळे खाचखळग्यांचा आहे. अनेक जागा या खोलगट असल्याने पर्यटकांना धोकादायक आहेत. त्यामुळे पर्यटकांना इथं कायम सुरक्षीत राहण्याच्या सूचना दिलेल्या असतात. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत पर्यटक धबधब्यात आतमध्ये जात असतात आणि त्यात अडकतात आणि दुर्घटना घडते अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सहस्रकुंड धबधब्यात पाणी भरपूर आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही प्रचंड आहे. धबझब्यातून खाली प्रचंड वेगाने येणारे हे पाणी नंतर पैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात येतं. त्यामुळे धोका जास्त वाढतो. यावर्षी पर्यटकांची गर्दीही जास्त असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनाही केलेल्या आहेत. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेंलगना आणि कर्नाटकातूनही पर्यटक सहस्रकुंड इथं येत असतात.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 15, 2019, 3:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading