कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळले, आई- वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या

कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळले, आई- वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या

पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, (प्रतिनिधी)

अहमदनगर, 26 ऑगस्ट: पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसह दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. म्हसे खुर्द या गावाजवळ असणाऱ्या बडे-ढवळे वस्तीत राहणारे बडे कुटुंबातील दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले अशा चौघे घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत आढळून आले. सोमवारी सकाळी ही घटना समोर आली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बाबाजी विठ्ठल बडे (वय- 40), कविता बाबाजी बडे (वय-35), आदित्य बाबाजी बडे (वय- 15) आणि धनंजय बाबाजी बडे (वय-13 )अशी मृतांची नावे आहे. सकाळी लवकर उठणारे बढे कुटुंब शेजारी राहणाऱ्या लोकांना न दिसल्याने त्यांनी घरात डोकावले असता नवरा-बायको आणि दोन्ही मुले हे घरातील एका पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर पारनेर पोलिसांना या ठिकाणी तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

पावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग!

पावसाने दोन महिन्यातच पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळामुळे हतबल झाल्याने एका शेतकऱ्याने तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडले आहे. पाऊस पाडावा म्हणून मारुती समोरच धरणे धरले आहे. 'देवा आत्ता तूच सोडवं, या दुष्काळाच्या संकटातून,' असे म्हणत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतील शेपवाडी येथील शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी अन्नत्याग केलाय.

उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे गावकरी चिंतातूर आहेत. अंबाजोगाई तालुक्यावर गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे भीषण सावट आहे. यावर्षी तर दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. खरीप पेरणी वाया गेली. रब्बीचा तर पेराच झाला नाही. यावर्षीही पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. यार्षीही पुन्हा पेरणी नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

गावात पिण्याचे पाणी नाही, रेशन नाही, शेतात गुरांना चारा नाही, पाणी नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती नसतानाही त्यांना पाच हजार रुपये टनदराने चारा खरेदी करावा लागतोय. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागलाय. या स्थितीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गुरांचे व माणसांचे बेहाल सहन होत नसल्याने बजरंगबलीचे निसिम्म भक्त ऊत्तमरावांनी श्रद्धेपोटी अन्नत्याग करून हनुमान मंदिरात ठाण मांडून बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी ही ते मंदिरात बसून आहेत. ग्रामस्थांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पाऊस आल्याशिवाय मंदिरातून जाणार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे.मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading