साईभक्तांवर काळाचा घाला.. झाडावर आदळली कार, चार जागेवर ठार

साईभक्तांवर काळाचा घाला.. झाडावर आदळली कार, चार जागेवर ठार

सर्वजण जालना जिल्ह्यातील शेवली येथील रहिवाशी आहेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम/विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

औरंगाबाद/जालना,30 नोव्हेंबर: शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. साईभक्तांच्या कारला औरंगाबाद-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमोल नंदू गवळकर (वय-18),आकाश बंडू शीलवनत (वय-19),आकाश प्रकाश मोरे (वय-20) आणि दत्ता डांगे (वय-24) या चौघांचा जागेवरच मृत्यु झाला. किरण संजय गिरी (वय-21) आणि संतोष भास्कर राऊत (वय-22) हे गंभीर जखमी आले आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, जालना तालुक्यातील शेवली येथून शुक्रवारी रात्री नऊ वाजता सर्व मित्र कारने साईदर्शनासाठी शिर्डी येथे निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावर चालकाचा वाहनावरीस ताबा सुटून कार थेट झाडावर आदळली. मध्यरात्री रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेमुळे शेवली गावावर शोककळा पसरली आहे

पिकअप कोसळला नदीपात्रात, 7 ऊसतोड मजुरांचा जागेवरच मृत्यु

दुसरा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर झाला आहे. ऊस तोडणीसाठी उस्मानाबाद येथे जाणारा मजुरांनी भरलेला पिकअप थेट नदीच्या पुलावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात सात जणांचा जागेवरच मृत्यु झाला आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत तर 7 जण किरकोळ जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर धुळे जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरी नदीच्या पुलावर शु्क्रवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील रहिवासी आहेत. चालकाला अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने वाहन थेट पुलावरून खाली कोसळले. पिकअप पुलावरून खाली कोसळताना मोठा आवाज झाला. गावकऱ्यांनी तातडीने पुलावर धाव घेतली. मात्र, अंधार असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी आल्या.

मध्यप्रदेशातील ढवळ्या विहीर (ता.सेंधवा) येथून मजुरांचे वाहन ऊस तोडणीसाठी उस्मानाबादकडे जाते होते. त्यावेळी मध्यरात्री हे वाहन धुळे जिल्ह्यातील शिरुर गावाजवळील विंचूर फाट्यावर बोरी नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात जवळपास सात जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत जवळपास 24 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात रात्री झाल्याने उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

First published: November 30, 2019, 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading