पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

मतदानाला काही दिवस राहिलेले असतानाच भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 15 ऑक्टोंबर : राज्याच्या राजकारणात सुरू झालेलं पक्षांतराची लोण असूनही गेलेलं नाही. मतदानाला काही दिवस राहिले असतानाच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेत्यांचं जाणं सुरूच आहेत. आष्टी मतदारसंघातले भाजपचे नेते आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत दरकेर यांनी हातावर घड्याळ बांधलं. दरेकर हे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे व्याही आहेत. दरेकर यांचं राष्ट्रवादीत जाणं हा पंकजा मुंडे यांना धक्का मानला जातोय. याआधी काँग्रेसचे परळीतले नेते टी.पी. मुंडे यांना भाजपमध्ये घेऊन पंकजा मुंडे यांनी काँग्रेसला धक्का दिला होता. दरेकर यांनी आष्टीमधून भाजपची उमेदवारी मागीतली होती. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी न देता भिमराव धोंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दरेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीचा रस्ता पकडला.

लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना

आष्टी मतदारसंघात कडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा आयोजित केली होती. या सभेतच दरेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. दरेकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मित्रांच्या डोळ्यादेखत सहस्त्रकुंड धबधब्यात वाहून गेले 4 जण

या याधी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत असलेले कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेचा वाटा दिला नाही, वारंवार डावलले. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 05:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading