15 ऑगस्टला धनंजय मुंडेंच्या गाडीखाली जीव देणार, शहीद जवानाच्या पत्नीचा टोकाचा इशारा

15 ऑगस्टला धनंजय मुंडेंच्या गाडीखाली जीव देणार, शहीद जवानाच्या पत्नीचा टोकाचा इशारा

'माझे पती देशासाठी संघर्ष करत शहीद झाले. पण मी या लाल फितीच्या कारभाराला पूर्णपणे वैतागले आहे.'

  • Share this:

बीड, 13 ऑगस्ट : महसूल प्रशासनाच्या लाल फितीतील कारभाराला कंटाळून भाग्यश्री राख या वीरपत्नीने टोकाचा इशारा दिला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आठ दिवसात जमीन मिळेल असे आश्वासन देऊन आठ महिने उलटले मात्र न्याय मिळत नसल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जीव देण्याचा इशारा दिला आहे. शासन निर्णयानुसार शहिदांच्या वारसा दोन हेक्टर जमीन देण्यात यावी असा निर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या वीर पत्नीची ससेहोलपट सुरू आहे. वीरपत्नी बरोबरच जिल्हयातील 15 शहिदांच्या कुटुंबाला अद्याप लाभच मिळाला नाही.

पाटोदा तालुक्यातील भाग्यश्री तुकाराम राख या गेल्या दोन वर्षापासून जिल्हा अधिकारी कार्यलयात खेटे मारत आहेत. परिश्रम घेत कागदपत्रे गोळा केली. फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. मात्र त्यांच्या फाईलवर सहीच झाली नाही. आज या-उद्या या असं म्हणतं गेल्या दोन वर्षापासून भाग्यश्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे. अर्ज विनंत्या करूनदेखील जमीन मिळत नसल्याने नावीलाजाने वैतागून भाग्यश्री यांनी टोकाचा इशारा दिला आहे.

पाटोदा तालुक्यातील थेरला इथल्या शहीद जवान तुकाराम राख हे 1 मे 2010 मध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झाले. त्यांच्यानंतर भाग्यश्री या एकट्याने संघर्ष करत कुटुंब चालवत आहेत.

पुणेकरांसाठी ALERT, पूल पाण्याखाली जाणार असल्याने या भागातून प्रवास करणं टाळा

महाराष्ट्र शासनाच्या 28 जुन 2018च्या शासन निर्णयान्वये शहिदांच्या वारसाना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देन्यात यावी असा निर्णय आहे. पण अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत उडवाउडवीची उत्तरे देतात. माझी फाईल पूर्ण असताना देखील 2 वर्षापासून सही होत नाही. मी एकटीने किती वेळा चकरा माराव्या असा संताप भाग्यश्री यांनी व्यक्त केला.

तसंच या बाबतीत सामजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी न्युज18 लोकमतच्या बातमीनंतर आठ दिवसात जमीन देण्याचं आश्वासन दिले होते. यावर आठ महिने झाले. मात्र जामीन मिळत नाही, म्हणून आता धनंजय मुंडे यांच्या गाडी खाली जीव देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. तसं पत्र जिल्हा अधिकारी यांना दिलं आहे.

अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

'माझे पती देशासाठी संघर्ष करत शहीद झाले. पण मी या लाल फितीच्या कारभाराला पूर्णपणे वैतागले आहे. आता लढा नाही देऊ शकत. त्यामुळे मी माझ्या वीर पतीला भेटायला जात आहे. माझ्या मुलीला सांभाळा असं त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

रोज कार्यालय उघडण्याच्या वेळी येणाऱ्या भाग्यश्री अनेक दिवसापासून चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात अशीच अवस्था 15 शहिदांच्या वारसांची आहे. शहीदांच्या पत्नी बाबतीत तरी कर्मचारी अधिकाऱ्यांनी सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यामुळे निगरगट्ट प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या बाबतीत जिल्हा अधिकारी यांना विचारणा केली असतात आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शन मागवलं आहे, ते मिळाले नाही असं ऑफ कॅमेरा त्यांनी सांगितलं. तर धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही असंही त्या म्हणाल्या.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 13, 2020, 11:06 PM IST

ताज्या बातम्या