'चाईल्ड पॉर्नोग्राफी'चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पहिला गुन्हा दाखल

'चाईल्ड पॉर्नोग्राफी'चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पहिला गुन्हा दाखल

सिडको, सातारा आणि छावणी परिसरात बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,12 जानेवारी:'चाईल्ड पॉर्नोग्राफी'वर बंदी असताना सिडको, सातारा आणि छावणी परिसरात बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी व्हिडिओ लोड करणाऱ्या फेसबुक प्रोफाइलविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने पुढाकार शहरात प्रथमच ही कारवाई केली आहे.

बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ एकाने फेसबुकसह इतर सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी या किळसवाण्या प्रकाराबाबत 18 डिसेंबर 2019 रोजी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलीस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. 30 मार्च 2019 रोजी शहरातील सिडको हद्दीतून चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ तसेच डिसेंबर महिन्यात सातारा आणि फेसबुकवर लोड केल्याचे दिसून आले. ज्या व्यक्तीने बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत तिच्या संगणकाच्या आयपी ॲड्रेस अथवा वापरलेल्या मोबाइल सिम कार्ड क्रमांकावरून सातारा, छावणी, आणि सिडको अशा संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहे.

विदेशात चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदी आहे. त्या धर्तीवर देशात देखील बंदी घालण्यात यावी, म्हणून पावले उचलण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भात सोशल मीडियावर अश्लिल व बिभित्स व्हिडिओ पसरविले (व्हायरल) जात आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात व्हिडिओ 'सीडी'ज तयार केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीची माहिती समोर येऊ नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 11:14 AM IST

ताज्या बातम्या