नांदेड: काँग्रेसचे 'गोल्डमॅन' गोवींद कोकुलवार यांच्या पाठीवर झाडली गोळी

काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 08:51 PM IST

नांदेड: काँग्रेसचे 'गोल्डमॅन' गोवींद कोकुलवार यांच्या पाठीवर झाडली गोळी

मुजीब शेख (प्रतिनिधी)

नांदेड, 17 ऑगस्ट- काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शनिवारी (17 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गोविंद कोकुलवार त्यांच्या पाठीवर अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली. या हल्यात कोकुलवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नांदेडमधील खासगी रूगणलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोकुलवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.

मिळालेली माहिती अशी की, गोवींद कोकुलवार हे शनिवारी सायंकाळी चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आले असता दूचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पाठीवर जवळून गोळी झाडली. नंतर हल्लेखोर पसार झाला. दरम्यान, या घटनेनंतर चौफाळा भागात तणाव पसरली आहे.

खंडणीसाठी धमकी...

काही दिवसांपूर्वी गोविंद कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याची देखील माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर देखील गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

Loading...

कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...