शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला, आमदारानंतर खासदारावरही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 31 डिसेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील या दोन चुलत भावांमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. आमदार राणा पाटील यांच्यावर काल खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाल्यावर आज खासदार ओमराजेंवरही गुन्हा नोंद करणयात आला आहे. राणा पाटील यांचे पंचायत समिती समर्थक सदस्य हे ओमराजे यांनी उचलून नेवून बोरगाव इथं हिम्मतराव पाटील यांच्या घरी नेवून ठेवल्याचा आरोप राणा पाटील यांनी केला. तसंच हे सदस्य परत आणण्यासाठी गेले असता राणा पाटील यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिम्मतराव पाटील यांनी केला आहे.

अजित पवार, जयंत पाटील नाही तर 'या' नेत्याची गृहमंत्रिपदासाठी चर्चा!

हिम्मतराव पाटील यांच्या आरोपानंतर राणा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर अकलूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राणा पाटील यांच्या सहकार्यांना जी मारहाण झाली होती त्यातील सतीश दंडणाईक यांच्या तक्रारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि हिम्मतराव पाटील यांच्यावरदेखील आज जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अकलूज पोलिसात दाखल झाला आहे.

खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील यांच्यासह 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ज्या पंचायत समिती सभापती वरून हा वाद सुरू आहे त्याची निवड आज केली जाणार आहे.

शिवसेनेच्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी दिला डच्चू

राणा पाटील आणि समर्थकांवरही गुन्हा दाखल

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काल गुन्हा नोंद झाला आहे. राणा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी बोरगाव या ठिकाणी जाऊन हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 08:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading