मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Lockdown : AMIMच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये कॉन्ट्रॅक्टवरून तुफान हाणामारी, दोन जखमी

Lockdown : AMIMच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये कॉन्ट्रॅक्टवरून तुफान हाणामारी, दोन जखमी

कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच राजकारण्यांची आपला वाटा खाण्यावरून सुरू असलेली भांडण थांबलेली नाहीत हेच सिद्ध झालं आहे.

औरंगाबाद 14 मे: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर झालाय. रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अशा काळात लोकांचे प्रतिनिधी असणाऱ्या आजी माजी नगरसेवकांनी लोकांना धीर देणं आणि प्रशासनाची मदत करणं अपेक्षीत आहे. लॉकडाऊनमुळे सगळी कामं बंद आहेत. अशा परिस्थितीत शहरात आज AMIMच्या दोन नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले आहेत. ईलेक्ट्रीक विभागाचं कॉन्ट्रॅक घेण्यावरून ही हाणामारी झाल्याचं उघड झाल्यानं कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच राजकारण्यांची आपला वाटा खाण्यावरून सुरू असलेली भांडण थांबलेली नाहीत हेच सिद्ध झालं आहे. AMIMचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी आणि अज्जू नायकवडी यांच्यात पक्षातही वर्चस्वावरून रस्सीखेच होती. दोघांचेही कॉन्ट्रॅक्टचे व्यवसाय आहे. त्यामुळे राजकारणातली लढाई व्यवसायातही आली. राजकीय वजन वापरून कंत्राटं घ्यायची आणि मलिदा लाटायचा हा सगळ्याच महानगरांमध्ये आता धंदाच झालाय. त्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाची काम होतात असाही सार्वत्रिक अनुभव आहे. ही कंत्राटं या राजकारण्यांच्या नावावर कधीच नसतात तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर घेतली जातात. अशीच कंत्राटं ही दोनही माजी नगरसेवक घेत होते. त्यातूनच त्या दोघांमध्ये वाद होता. त्या वादाचं रुपांतर भांडणात आणि हाणामारीत झालं. या दोघांच्या भांडणात त्यांचे भाऊमध्ये पडले आणि त्यांच्यात दे दणादण झालं. या भांडणात ते दोघही जखमी झाले. या भांडणांमुळे AMIMमधला वाद आणि राजकारण्यांचं कंत्राटी राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. हे वाचा -  तिहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरलं! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना लॉकडाऊनमध्ये अनोखा विवाहसोहळा; कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ
First published:

Tags: MIM

पुढील बातम्या