Home /News /maharashtra /

जावयाने सासरी केला खोटा फोन, घरी पोहोचल्यावर लेकीला पाहताच आईला बसला धक्का

जावयाने सासरी केला खोटा फोन, घरी पोहोचल्यावर लेकीला पाहताच आईला बसला धक्का

योगिताने वडिलांना फोन करून सगळं सांगितलं. आता एवढे पैसे कुठून आणणार असं म्हणत मुलीची समजुत काढली. मात्र नवरा आणि सासुचा पैशासाठी तगादा सुरूच होता.

    औरंगाबाद 10 नोव्हेंबर: लग्नानंतर पाच वर्ष झाल्यानंतरी सासरच्या लोकांकडून पैशाची मागणी संपलीच नव्हती. नवरा आणि सासुने पुन्हा 20 हजारांची मागणी केली. वडिलांकडे किती पैसे मागणार या विवंचनेत असलेल्या विवाहितेने अखेर टोकाचा निर्णय घेत चिमुकल्या मुलीसह आत्महत्या (married woman committed suicide) केली. सासरी गेल्यानंतर मुलगी आणि नातील पाहताच तिच्या आईने एकच हंबरडा फोडला तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. जिल्ह्यातल्या दहेगाव बंगला इथं योगिताचं विठ्ठल याच्याशी झालं होतं. लग्नाला पाच वर्ष झाली होती. त्यांना प्रगती आणि चौदा महिन्यांची अक्षता अशा दोन मुली होत्या. विठ्ठल आणि त्याची आई ही योगिताला पैशासाठी सारखा तगादा लावत होती. त्यांनी खर्चासाठी योगिताकडे 20 हजार रुपये माहेरून आणण्याची मागणी केली. त्यानंतर योगिताने वडिलांना फोन करून सगळं सांगितलं. आता एवढे पैसे कुठून आणणार असं म्हणत मुलीची समजुत काढली. नवरा आणि सासुचा पैशासाठी तगादा सुरूच होता. वडिलांची होणारी कुचंबणा आणि सासरचा त्रास याला कंटाळून योगिताने लहानग्या अक्षताला घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. नंतर  जावयाने योगिताच्या माहेरी फोन करून अक्षता विहिरीत पडल्याचं सांगितलं आणि योगिताही दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर योगिताचे आईवडिल आणि भाऊ जेव्हा  बघायला आले तेव्हा त्यांना योगिता आणि अक्षता गेल्याचं कळलं. मुलगी आणि लळा लावणारी नात गेल्याने योगिताच्या आईने हंबरडा फोडला. त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. नंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या