मुलगा माझा नाही दुसऱ्याचा.. जन्मदात्यानेच तान्हुल्याच्या डोक्यात घातला वरवंटा

मुलगा माझा नाही, दुसऱ्याचा... या संशयातून जन्मदात्याने 8 महिन्यांच्या तान्हुल्याचा अनन्वित छळ करून जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 06:36 PM IST

मुलगा माझा नाही दुसऱ्याचा.. जन्मदात्यानेच तान्हुल्याच्या डोक्यात घातला वरवंटा

लातूर, 12 ऑगस्ट- मुलगा माझा नाही, दुसऱ्याचा... या संशयातून जन्मदात्याने 8 महिन्यांच्या तान्हुल्याचा अनन्वित छळ करून जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. निर्दयी बापाने आपल्या मुलाला ठार मारण्याआधी गरम ग्लासाचे चटके दिले होते. त्याच्या डोळ्यात तिखट टाकले होते. लोखंडी उलथन्याने मारहाण केली होती. शेवटी दगडी वरवंटा डोक्यात घालून चिमुरड्याची क्रूरपणे हत्या केली. स्वप्नील असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. शनिवारी (10 ऑगस्ट) रात्री ही घटना लातूर शहरातील संजयनगरात घडली. पोलिसांनी रविवारी आरोपी बाप सोमनाथ शिवाजी साळुंके याला अटक केली आहे.

पहिला मुलगा झाला, पण..

सोमनाथ साळुंके आणि माधुरी साळुंके या दाम्पत्याला विवाहानंतर पहिला मुलगा झाला. पण सोमनाथ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातच या दाम्पत्याला दुसऱ्यांदाही मुलगा झाला. मात्र, हा मुलगा माझा नाही, असा संशय सोमनाथ होता. या संशयावरून त्याने माधुरीचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला होता. एवढेच नाही तर आठ महिन्यांच्या स्वप्नीलला पाण्यात पाहात होता. तो त्याचा सारखा तिरस्कार करत होता. तान्हुल्याला चहाच्या गरम ग्लासाचे चटके देणे, डोळ्यात तिखट टाकणे असा छळ करत होता. शनिवारी रात्री सोमनाथने स्वप्नीलला लोखंडी उलथने बेदम मारहाण केली. शेवटी त्याने दगडी वरवंटाच त्याच्या डोक्यात घातला. तान्हुल्या स्वप्नीलने जागेवरच जीव सोडला. माधुरी साळुंके ( वय-24, रा. संजयनगर, लातूर) हिने दिलेल्या तक्रारीवरून नराधन बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

आई-वडील झोपले होते.. चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू

दुसरी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशकात घडली आहे. तन्मय दीपक भोये असे मृत बालकाचे नाव आहे. तन्मय खेळता खेळता बादलीत पडला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरून झाला. पंचवटी भागातील दळवी चाळमध्ये रविवारी दुपारी ही दुखद घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा तन्मयचे आई-वडील घरात झोपले होते.

Loading...

मिळालेली माहिती अशी की, भोये कुटुंबातील सर्व सदस्य रविवारी दुपारी बारा वाजेच्या घरात झोपले होते. त्यावेळी तन्मय खेळता-खेळता बाथरुमजवळ गेला. पाण्याने भरलेल्या बादलीजवळ तन्मय डोकावून पाहत असतानी त्याचा तोल गेला आणि तो बादलीत खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेत पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास करता आला नाही. त्यातच त्याची गुदमरून मृत्यू झाला. तन्मय पाण्यात पडल्याचे समजताच भोये कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...