Elec-widget

धक्कादायक..आईसोबतच अनैतिक संबध? वडिलांकडून मुलाचा निर्घृण खून

धक्कादायक..आईसोबतच अनैतिक संबध? वडिलांकडून मुलाचा निर्घृण खून

मुलगा पाणी प्यायला उठला असता सून व पत्नीसमोरच आरोपीने चाकूने भोसकून त्याची हत्या केली.

  • Share this:

उस्मानाबाद,6 ऑक्टोबर: चारित्र्याच्या संशयावरून वडिलांनी पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा पाणी प्यायला उठला असता सून व पत्नीसमोरच आरोपीने चाकूने भोसकून त्याची हत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यात जवळा (खुर्द) येथे शुक्रवारी (4 ऑक्टोबर) ही घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा पावसात पाठलाग करून त्याला अटक केली आहे. आरोपी माजी पोलिस पाटील आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळा या गावात 65 वर्षीय शहाजी रामा कांबळे याने त्याचा 35 वर्षीय मुलगा सुनील शहाजी कांबळे याची हत्या केली. मुलाचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय शहाजीला होता. या संशयातून त्याने शुक्रवारी सायंकाळी घरात मुलगा पाणी प्यायला असताना सून व स्वतःच्या पत्नीसमोर चाकूने भोसकून वार केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान, जखमी मुलाला नातेवाइकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी सुनीलची पत्नी रेश्मा कांबळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून जात असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, मुख्य अंमलदार ज्ञानेश्वर पोफलायत, शिवाजी गवळी, बाबासाहेब मोराळे, लक्ष्मण सगर यांनी शनिवारी पहाटे 3 वाजता पाठलाग करून अटक केली. दरम्यान, कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे करत आहेत.

VIRAL VIDEO:व्यसनानं केला घात! पोलीसच निघाला अट्टल चोर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...