Home /News /maharashtra /

धक्कादायक! एका क्षणात वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू, पुलाच्या पाण्यात मोटारसायकल वाहिली आणि...

धक्कादायक! एका क्षणात वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू, पुलाच्या पाण्यात मोटारसायकल वाहिली आणि...

मुलीचा मृतदेह आज सकाळी सापडला तर अन्य दोन मृतदेहांचा शोध नदीच्या कडेने प्रशासनासह नातेवाईक घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बीड, 24 जुलै : पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात मोटारसायकल घातल्याने वडील आणि दोन मुलं वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. यात बाप लेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेवराई तालुक्यातील बालमटाकडी इथल्या कृष्णा घोरपडे (वय 35) मुलगा (वय 8), मुलगी (वय 5) हे गाडीवर जात असताना अमृता नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटारसायकल घातली. यात वडिलासह असलेली दोन्ही मुलं वाहून गेली. यातील मुलीचा मृतदेह आज सकाळी सापडला तर अन्य दोन मृतदेहांचा शोध नदीच्या कडेने प्रशासनासह नातेवाईक घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यामध्ये रात्री धुव्वाधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नद्यांना पाणी आलेले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान बालमटाकळी कृष्णा घोरपड हे दुचाकीवरून जात असताना पौळाचीवाडीजवळ आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला या पावसामुळे अमृता नदीला पुर आला. पुलावरून ओसंडून पाणी वाहू लागलेले असताना घोरपडे यांनी वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. याला म्हणतात खाकी वर्दी! चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत या वेळी ते मोटारसायकलसह वाहून गेले. रात्र असल्याने याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान खळेगाव येथील तीन युवकांनी याच पुलावरून गाडी घातली, त्यांचीही गाडी स्लिप होऊन ते नदीत पडले. मात्र तिघांनाही पोहता येत असल्याने ते गाडी सोडून किनार्‍यावर आले व दुसऱ्या दिवशी आपली गाडी शोधण्यासाठी नदीत उतरले असता त्यांना त्यांची गाडी न सापडता दुसरीच गाडी सापडली. महालक्ष्मी मंदिरासमोर तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ पुण्यात 4 फुटी गणेशमूर्तींचा वाद अखेर निकाली, महापौरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय यावरून अन्य लोकही नदीत पडले असल्याची शंका आली. याच दरम्यान घोरपडे यांचे नातेवाईक अमृता नदीच्या पुलाजवळ आले, कारण रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगितले होते की, मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय, असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांच्या शोधार्थ अमृता नदीच्या पुलाजवळ आले होते. त्यांचा शोधाशोध घेतल्यानंतर ५ वर्षीय मुलीचा मृतदेह दुपारी सापडला. मात्र कृष्णा घोरपडे आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह प्रशासनासह घोरपडे यांचे नातेवाईक घेत आहेत. या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या