निष्काळजीपणाचे बळी.. बस-रिक्षाचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू

निष्काळजीपणाचे बळी.. बस-रिक्षाचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू

. वळण रस्ता आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,9 नोव्हेंबर: रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणाचे आणखी दोन बळी गेले आहेत. केज तालुक्यातील बरड फाटा येथे एसटी बस आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (शुक्रवार) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी की, केज-मांजरसूंबा-पाटोदा रस्त्याचे काम सुरु आहे. काम करताऱ्या एचपीएम (HPM)कंपनी च्या निष्काळजीपणाचे आणखी दोन बळी गेले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वळण रस्ता आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

विक्रम आणवने (वय- 55), दत्ता विक्रम आणवने (वय-15, दोघे.रा.चाकरवाडी ता.बीड) अशी अपघातातील मृत बाप-लेकांची नावे आहेत. चाकरवाडीकडे परतत असताना त्यांच्या रिक्षाला बरड फाट्यापासून बोरीच्या बागाजवळ औरंगाबाद-लातुर बसने जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात भूषण लहाने, गोविंद मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्त्याचे करणाऱ्या कंपनीने अनेक पुलाचे अर्धवट काम केले. तर दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

मांजरसुंबा घाटात खोल दरीत कोसळली स्कॉर्पिओ; तीन ठार

दरम्यान, गेल्या आठवड्यात कपीलधारकडून मांजरसुंब्याच्या घाटमार्गाने बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला भीषण अपघात झाला होता. गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एक गंभीर जखमी असून त्याला जिल्हा रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हरीश कांबळे (वय 30), सचिन सुरवसे (वय 32), संतोष काळे, धम्मानंद वीर व (सर्व राहणार बीड) हे फिरण्यासाठी कपीलधार येथे जात होते. यावेळी मांजरसुंबामार्गे कपीलधारकडे जात असताना घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने स्कार्पिओ (एमएच-14 एवाय-1485) दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये हरीश कांबळे, सचिन सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. संतोष काळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धम्मानंद वीर हा गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading