म्हशीची धार काढण्यापासून ते थेट PSI, शेतकरी पुत्राचा थक्क करणारा प्रवास

म्हशीची धार काढण्यापासून ते थेट PSI, शेतकरी पुत्राचा थक्क करणारा प्रवास

स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विशालने 2014मध्ये पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नंतर सुरू झाली त्याची खरी कसोटी.

  • Share this:

मुंबई 21 मार्च : MPSC देऊन PSI होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र स्पर्धा परिक्षांचा अभ्यास हा संयमाची परीक्षा पाहणारा असतो. आर्थिक परिस्थिती बेताची, वडिलांची कोरडवाहू शेती. पाऊस आला तरच शेती होणार, नाहीतर ज्वारीचा दाणाही निघत नाही अशी अवस्था, मग जोडधंदा म्हणून दूध दुभतं आणि राब राब राबणं. अशी प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातल्या एका तरुणाने पोलिसांत जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि PSI होत ते प्रत्यक्षातही उतरवलं. अविश्रांत परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे विशाल अशोक पवार.

औरंगाबाद पासून 10 किलोमीटर असणारं बाळापूर हे त्याचं गाव. वडिलांची कोरडवाहू शेती. त्यानं कुटुंबाचा उदनिर्वाह चालवणं अवघड असल्याने विशालच्या वडिलांनी म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय सुरु केला. त्याची जबाबदारी विशालवर होती. म्हशींना चारा घालणं, दुध काढणं, त्याचं वाटप करणं असं सगळं विशाल करत असे. मात्र हे अंगमेहनतीचं काम करत असतानाही त्याची अभ्यासाची जिद्द काही कमी झाली नाही.

परराज्यातल्या बसेसना महाराष्ट्रात बंदी, राज्यातल्या बसही सीमा ओलांडणार नाहीत

स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विशालने 2014मध्ये पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नंतर सुरू झाली त्याची खरी कसोटी. दररोज 8 ते 10 तास अभ्यास आणि वाचन करणं असं सगळं सुरु होतं. त्याने तब्बल चार वेळा त्याने परीक्षा दिली. त्यात तीन वेळा तो मुख्य परीक्षेपर्यंत जाऊन आला.

पण पुढे जाता आलं नाही. अखेर 2018 मध्ये त्याला यश मिळालं. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखतही पार पडली. त्याचा निकाल नुकताच लागला आणि विशालला चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रातून तो 46 वा आला आणि PSI होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं.

पोटात असताना वडिलांचं निधन, आईच्या कष्टाचं चीज करत PSI परीक्षेत मुलीने मिळवलं यश

मुलाच्या कष्टाला फळ मिळाल्यामुळे त्याच्या पालकांनीही आनंद व्यक्त केलाय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MPSC
First Published: Mar 21, 2020 10:11 PM IST

ताज्या बातम्या