मानलं या बापाला...शेतकऱ्याने मुलीची पाठवणी केली चक्क हेलिकॉप्टरने

मानलं या बापाला...शेतकऱ्याने मुलीची पाठवणी केली चक्क हेलिकॉप्टरने

लग्न झाल्यानंतर सगळ्या पंचकोशीत चर्चा रंगली होती ती हेलिकॉप्टरची आणि त्यातून जाणाऱ्या नवरी-नवरेदावांची. या नवदाम्पत्याला निरोप देण्यासाठी अख्ख कुटुंब हेलिपॅडवर जमलं होतं.

  • Share this:

नांदेड 16 फेब्रुवारी : मुलीच्या इच्छेखातर एका शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाची वरात आणि पाठवणी हेलिकॉप्टरने केली. मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात पहिल्यादाच हेलिकॉप्टरने वरात आणि पाठवणी झाली. त्यामुळे सगळ्या पंचकोशीत या लग्नाची चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील कोंढा गावचे शेतकरी नारायणराव कदम यांच्या मुलीचा लग्न सोहळा रविवारी संपन्न झाला. त्या लग्नात चक्क हेलिकॉप्टर आणल्याने सगळेच वऱ्हाडी आनंदून गेले.

कदम यांची मुलगी शिल्पा हिचा विवाह हिंगोली जिल्हयातील उखळी गावच्या मोहन गायकवाड या तरुणासोबत झाला. आपल्या विवाहात हेलिकॉप्टरने वरात निघवी अशी इच्छा शिल्पा हिने शेतकरी वडील नारायण कदम आणि भाऊ रामराम कदम यांच्याकडे बोलून दाखवली.

तेव्हा मुलीची ही ईच्छा पूर्ण करण्याचे वडील आणि भावाने ठरवले. त्यानुसार कोंढा गावातून वधू- वराची वरात पिंपळगाव येथील मंगल कार्यालयापर्यंत आली. लग्न सोहळा झाल्यानंतर नवरदेवाच्या उखळी या गावापर्यंत नवरी - नवरदेवाची पाठवणी करण्यात आली. हेलिकॉप्टरसाठी कदम कुटुंबियांना तब्बल आठ लाख रुपये खर्च आला. पण मुलीच्या इच्छेसाठी वडिलांनी तिची ही इच्छा पूर्ण केली.

नाशिक दौरा रद्द करून शरद पवार मुंबईत , उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

अर्धापूर भागात कॅनॉलचं पाणी येत असल्यामुळे ऊस आणि हळद ही नगदी पीकं घेतली जातात. त्यामुळे हा भाग सधन आहे. कुटुंबातल्या सगळ्यांची इच्छा असल्याने आणि शेतकरीही काहीतरी करू शकतो हे दाखवायचं असल्याने लग्नात हेलिकॉप्टर आणल्याचं मुलीचे वडिल नारायण राव कदम यांनी सांगितलं. या विवाह सोहळ्याला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण याही उपस्थित होत्या.

केजरीवालांची 'फुकट'योजना राज्यात नको, पवारांनी काँग्रेसच्या मंत्र्याला फटकारलं

लग्न झाल्यानंतर सगळ्या पंचकोशीत चर्चा रंगली होती ती हेलिकॉप्टरची आणि त्यातून जाणाऱ्या नवरी-नवरेदावांची. या नवदाम्पत्याला निरोप देण्यासाठी अख्ख कुटुंब हेलिपॅडवर जमलं होतं.

 

 

First published: February 16, 2020, 5:02 PM IST
Tags: helicopter

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading