पिके जाळताहेत.. पतीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, महिला शेतकऱ्याची आत्महत्या

पिके जाळताहेत.. पतीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, महिला शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळामुळे पिके जाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पतीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या नैराश्येतून महिला शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

बीड, 18 ऑगस्ट- शेतकरी आत्महत्याचं सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. दुष्काळामुळे पिके जाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पतीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या नैराश्येतून महिला शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संगीत बजगुडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बीड तालुक्यात बेलखंडी पाटोदा गावात ही घटना घडली आहे.

शेतकरी भागवत बजगुडे यांच्याकडे बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. दुष्काळात ते थकले आहे. यंदाही पाऊस नाही. पाण्याअभावी पिके जाळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे संगीत बजगुडे यांनी विष घेऊन आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, सध्या बीड जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे.

तरुण शेतकऱ्याची बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. गंगापूर तालुक्यातील दिनवाडा गावात गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. किशोर कल्याणराव ठोंबरे असे तरुण शेतकऱ्यांचे नाव होते. दिनवाडातील किशोर ठोंबरे हा घरातील सर्वात मोठा तसेच एकुलता एक मुलगा होता. घरातील कर्ता व्यक्तीने आत्महत्या केल्याने ठोंबरे कुटूंब अजूनही दु:खातून बाहेर आलेले नाही.

गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतीचे उत्पन्न हे जेमतेम होते. सततची नापिकी आणि खासगी सावकार तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड, या विवंचनेतून किशोर याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. किशोर याने स्वतःच्या मालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाला फाशी घेत मृत्यूला कवटाळले.

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading