हायकोर्टासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा इशारा देणं 'या' नेत्याला पडलं महागात

हायकोर्टासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा इशारा देणं 'या' नेत्याला पडलं महागात

शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी पोलिसांनी 24 तासांपासून नजरकैदेत ठेवले आहे.

  • Share this:

बीड, 26 ऑगस्ट-उच्च न्यायालय खंडपीठासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा इशारा देणं, बीडमधील एका शेतकरी नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी पोलिसांनी 24 तासांपासून नजरकैदेत ठेवले आहे. माजलगाव येथील शेतकरी नेते भाई थावरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

कारखान्याकडून शेतकर्‍यांची ऊस बिल अदा केली नाहीत. गाळप हंगाम 2018-19 ची एफआरपीरक्कम अद्याप थकीत आहे. सदर कारखान्याची मालमत्ता विक्री करून ऊस उत्पादक शेतकरी याची थकीत एफआरपी रक्कम अदा करण्याचे निर्देश 25 जून 2019 रोजी देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाचे आदेश असूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही.मग न्याय मिळणार कधी?, या संदर्भात शेतकरी नेते भाई थावरे यांनी औरंगाबाद खंडपीठासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान माजलगाव शहर पोलीसांनी रविवारी भाई थावरे यांना ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवल्याची कारवाई केली. भाई थावरेंना या आंदोलनापासून रोखण्यासाठी माजलगाव शहर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये थावरेंना नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे.

13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय..

ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांचे गर्भाशय काढल्या संदर्भातल्या घटना उघड झाल्या होत्या. हा विषयात विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. या बाबतीत विधिमंडळ चौकशी समितीने बीड जिल्ह्यातील महिलांसोबत संवाद साधून माहिती घेतलीय. या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघडकीस आलीय. या संबंधीचा अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे. सर्वेक्षणात सर्वच 82 हजार 900 ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीय.

बीड जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचे समोर आले होते. काही खासगी रुग्णालयांनी अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया केल्याचेही काही प्रकरणांत समोर आले होते त्यानंतर, राज्य सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती या समितीने दोन महिन्यापूर्वी बीडमधील महिलांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिकांशी बोलून अडचणी व उपाययोजना जाणून घेतल्या होत्या.

चौकशी समितीने जिल्ह्यातील ऊसतोडणीला जाणाऱ्या महिलांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर, आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन ऊसतोडणी महिलांची माहिती घेण्यात आली. कधी व कोठे गर्भपिशवी काढली, याचा तपशील अहवालात आहे. अहवाल चौकशी समितीकडे पाठविण्यात आलाय. अहवालाचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

VIDEO: महिलेची छेड काढल्याप्रकरणी रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 12:06 PM IST

ताज्या बातम्या