सावधान...'पोलीस' असल्याचं सांगून लुटमार करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

तोतया पोलीस असल्याचं सांगून एका वृद्ध महिलेला दोन भामट्यांनी थाप मारून लुटलं आणि पोबारा केला. नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 07:55 PM IST

सावधान...'पोलीस' असल्याचं सांगून लुटमार करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

सचिन जीरे, औरंगाबाद 18 ऑगस्ट : पोलीस म्हटलं की नागरिकांना अजुनही धाक आणि आदर वाटतो. याच भावनेचा गैरफायदा घेत काही भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याचा उद्योग सुरू केलाय. औरंगाबादमध्ये अशा भामट्यांचे कारनामे उघड झाले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहनही औरंगाबाद पोलिसांनी केलंय.

शहरात पुन्हा तोतया पोलीस सक्रिय झाले असून रविवारी पुन्हा एका वृद्ध महिलेला दोन भामट्यांनी पोलीस असल्याची थाप मारून लुटलं. तुमचं सोनं आमच्याकडे द्या ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवतो असं म्हणत वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने त्यांनी काढून घेतले आणि पोबारा केला.  काही अंतरावर गेल्यावर हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. मात्र तोपर्यंत ते भामटे पसार झाले होते.

अमरावतीत ध्येय वेड्याने बांधलं चक्क प्लास्टिकच्या वेस्टेज बाटल्यांचं घर

जयश्री रसिकलाल गांधी असं वृद्ध महिलेचं नाव आहे. महिला बाजापेठेत खरेदीकरून घरी जात असताना  गजबजलेल्या औरंगपुरा  भागात संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस  परिसरातील सीसीटीव्हीचीही  तपासणी करत आहेत. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जालन्यात 'ट्रिपलसीट' चोरट्यांची दहशत

Loading...

काही वर्षांपूर्वी चड्डी बनियान टोळीने धुमाकू घातल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. आता मराठवाड्यातलं औद्यागिक शहर असलेल्या जालन्यात 'ट्रिपलसीट' चोरट्यांची दहशत निर्माण झालीय. एका बाईकवर हे तिघं चोरटे फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहेत. मध्यरात्री ही लुटारुंची टोळी पाहिल्याचा दावा अनेकांनी केलाय. त्यांमुळे शहरात आता नागरिक आणि पोलीस हे गस्त घालत असून चोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सापळाही लावला आहे.

फक्त एका दोरीनं केली माय लेकरांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

शहरातील नवीन जालना भागात सध्या दुचाकीवर फिरत असलेल्या ट्रिपलसीट चोरट्यांची दहशत पसरलीय. एका दुचाकीवर स्वार असलेले हे अनोळखी इसम रात्री 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान, रस्त्यावर व गल्लीबोळात फिरत असून त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला आहे. त्यांच्या हातात खंजीर, तलवार किंवा टॉमी असते. गेल्या 15 दिवसात मोदीखाना, पेन्शनपुरा, गोपालपुरा, बडी सडक, कावडपुरा, हमालपुरा, सिंधी मंदिर या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांना पाहिल्याचा दावा केलाय.

तीन भारतीय महिला पाकिस्तानला ठरल्या भारी, हा VIDEO पाहाच

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या 'ट्रिपलसीट' चोरट्यांनी पोलिसांना जणू खुले आव्हानच दिले आहे. पोलीस मात्र अद्यापही या चोरट्यांचा छडा लावण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याने आता या परिसरातील तरुण मंडळीही रात्रीभर हातात दांडूके घेऊन गस्त घालत आहे. दरम्यान, पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग लावली होती. त्यामुळे काल पोलिस आणि नागरिक एकत्रितपणे पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...