अनैतिक संबंधाला मुलगा करत होता विरोध, बापाने असा काढला काटा..

अनैतिक संबंधाला मुलगा करत होता विरोध, बापाने असा काढला काटा..

घरासमोरील महिलेसोबत अशोक सदाशिव जाधव याचे अनैतिक संबंध होते. त्याला त्याच्या मुलाचा विरोध होता. याचा राग अशोकच्या डोक्यात होता.

  • Share this:

औरंगाबाद,11 ऑक्टोबर: मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर मुलाच्या खुनाचा गुंता उलगडला आहे. तीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव बापाने केला होता. राहुल अशोक जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याने बापानेच राहुलचा गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली होती, हे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी बाप अशोक सदाशिव जाधव याला पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल महापालिकेत कंत्राटी स्टोअर कीपर म्हणून कामाला होता तर आरोपी अशोक जाधव हा महापालिकेतच वरिष्ठ लिपिक आहे.

काय आहे प्रकरण..

घरासमोरील महिलेसोबत अशोक सदाशिव जाधव याचे अनैतिक संबंध होते. त्याला राहुलचा विरोध होता. याचा राग अशोकच्या डोक्यात होता. 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7 वाजता रेणुकानगर, गारखेडा येथील घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहुल मृतावस्थेत आढळून आला होता. अशोकने राहुलचा गळा आवळून हत्या केली. नंतर राहुलने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, ही आत्महत्या नसून वडिलांनीच त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार दीड वर्षानंतर उघडकीस आला. प्रलंबित गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षकांनी जुनी फाइल उघडली. ती बारकाईने बघितल्यावर त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ही धक्कादायक घटना समोर आली.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक घनश्याम सोनवणे आठ दिवसांपूर्वी प्रलंबित प्रकरणांच्या फायली चाळत होते. त्यांच्यासमोर राहुलच्या प्रकरणाची फाइल आली तेव्हा त्यात शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आलेला नाही, असे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा हा अहवाल का आला नाही, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तातडीने घाटीच्या डॉक्टरांशी संपर्क साधत अहवाल मागवला. त्यात राहुलचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी नोंदवल्याचे समोर आले. मग सोनवणेंनी उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्यासोबत चर्चा करून उपनिरीक्षक विकास खटकेंना सोबत घेत खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा वडिलांनीच मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचे उघड झाले. अशोक जाधवला महापालिकेतून अटक करण्यात आली.

अशोकची कुटुंबात होती दहशत...

अशोकने मुलाचा खून करून इतर मुलांनी धमकी दिली होती. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुमच्या आईचा खून करेल. त्यामुळे मुले, मुलगी, पत्नीने मौन बाळगले होते. परंतु त्यांच्या मनात खदखद होती. बुधवारी सोनवणे त्यांच्या घरी गेले तेव्हा गर्भवती असल्याने माहेरी आलेली राहुलची बहीण, आई घरातच होती. पोलिसांना पाहून त्यांचे डोळे पाणावले. राहुलची आई म्हणाली, उशिरा का होईना देवाने तुम्हाला पाठवले. आता माझ्या मुलाला न्याय मिळेल. पतीनेच मुलाला मारले, असे अशोकच्या पत्नीने सांगितले.

VIRAL VIDEO:धडधडत येणाऱ्या ट्रेनखाली आपणहून सरपटत गेला साप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading